News

onion prices: गेल्या महिनाभरात अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कांदा दरात वाढ झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार होणार आहे. (onion prices)

Updated on 18 October, 2022 12:12 PM IST

onion prices: गेल्या महिनाभरात अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कांदा दरात वाढ झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (onion prices)

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी झालेल्या लिलावात प्रति किलो चांगल्या प्रतीच्या कांद्याला 31 रुपये किलो भाव मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे.

गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कांद्याला सरासरी 15 ते 20 रूपयांपर्यत भाव स्थिर होते परंतु या भाववाढीमुळे पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात 28 हजार 497 गोण्यांची आवक झाली असल्याची माहिती सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली आहे.

आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ

गेल्या महिनाभरात पारनेर तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजार समितीत 31 रूपये कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळणार असून कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पारनेर बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव आठवड्यातील 3 दिवस चालू राहील.

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

यावेळी 1 ते 2 प्रतिच्या कांद्याला प्रतिक्विंटल 3000 ते 3100 रुपये बाजारभाव मिळाला तर 2 नंबरला 1300 ते 2100 तर 3 नंबरला 300 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकर्‍यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कच्च्या तेलाच्या घसरल्या! आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या...

English Summary: Big hike in onion prices; Know today's market price
Published on: 18 October 2022, 12:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)