शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करून उत्पन्न काढत असतो. मात्र अनेकदा त्याच्यावर अनेक संकटे आल्याने त्याचे मोठे नुकसान होते. आता असाच काहीसा प्रकार बोदवड जळगाव निमखेड येथे घडला आहे. येथील शोभा पुखराज जैन यांच्या शेतातील मक्याच्या गंजीला वीजतारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये ७० ते ७५ क्विंटल मका जळून खाक झाली आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आता पंचनामा देखील करण्यात आला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे सगळ्याची एकच पळापळ झाली.
येथील बोदवड तालुक्यातील निमखेड येथील शोभा जैन यांच्या मालकीच्या शेतातील कापणी करून ठेवलेला मका शॉर्ट सर्किटमुळे ७५ क्विंटल मका जळुन खाक झाली. अनेकांनी मोटर चालू करून त्यावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. यामुळे त्यांचे प्रयत्न वाया गेले. याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली. निमखेड्याचे तलाठी व्ही. एम. उगले यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. यामुळे शेतकऱ्याने नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
घटनेची तालुका कृषी अधिकारी सी. जी. पांडवी, मंडल कृषी अधिकारी लागे, कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी पाहणी केली. वीज वितरणचे कुलकर्णी यांनीही पाहणी केली. शेतकरी शेतात जाताच त्यांना शेतात मक्याला लागलेली आग दिसली. त्यांनी शेतीचा पंप सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण मका जळून खाक झाला असून, या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मका काही दिवसामध्येच बाजारात विकायला न्यायची होती. मात्र याआधीच हा प्रकार घडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
याप्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता चौकशी सुरु आहे. दरम्यान आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटांचा सामना करत आहे. अशातच शेतकऱ्यांची वीज देखील तोडली जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
Published on: 17 February 2022, 01:55 IST