News

अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत देशात टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत होते, त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशाच्या विविध भागात टोमॅटोच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

Updated on 21 September, 2023 11:51 AM IST

अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत देशात टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत होते, त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशाच्या विविध भागात टोमॅटोच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

यामुळे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असली तरी आता मात्र यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सरकारने उचललेल्या पावलांमुळे 250 रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचा भाव आता अनेक ठिकाणी 3 ते 10 रुपये किलो झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दिसून आला आहे.

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे. अशा स्थितीत सप्टेंबर 2023 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 9.56 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ऑक्टोबरमध्ये ते 13 लाख टन अपेक्षित आहे. अशा स्थितीत जास्त उत्पादन झाल्यास टोमॅटोचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

उद्यान विभागाने ग्राहक आणि अन्न व्यवहार विभागाशी याबाबत चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विभाग विविध राज्यांमधून 10 ते 20 कोटी रुपयांचे टोमॅटो खरेदी करू शकतो. टोमॅटोच्या घसरलेल्या किमतींबद्दल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

शेतकऱ्यांनो काजू शेती आहे फायदेशीर, जाणून महत्त्वाच्या गोष्टी..

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव झपाट्याने कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना खर्चाचे पैसेही मिळत नाहीत. अशा स्थितीत सरकारच्या या पाऊलामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांनो रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्याची पद्धत जाणून घ्या, मिळेल चांगले उत्पन्न

English Summary: Big fall in the price of tomatoes, at Rs 3 per share, now will the government pay attention to the farmers?
Published on: 21 September 2023, 11:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)