केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी दोन महत्वाच्या घोषणा करण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गासाठी बाजार समित्यांमार्फत एक लाख कोटी रुपये पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. तसेच कोरोना महामारी च्या विरोधात लढण्यासाठी 23 हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणाही करण्यात आली.
यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांनी त्यांच्यात असलेले गैरसमज दूर करावा.केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे बाजार समित्यांच्या अस्तित्व धोक्यात येईल, असा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पॅकेज कडे लक्ष द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की सरकार बाजार समित्या मजबूत करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी झेप विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. तसेच यापूर्वीही इन्फ्रास्ट्रक्चर साठी केंद्र सरकारने 1 लाख कोटींचा निधी जाहीर केला होता. याचा उपयोग बाजार समित्यांसाठी करता येणार असल्याचं नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.
तसेच यामध्ये कोहोना महाभारी विरोधात लढण्यासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. याआधीही केंद्र सरकारने या बाबतीत विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी पंधरा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये कोरूना सेंटर उभी करणे, हेल्थ सेंटर्स, कोरोना लॅब, यांच्या विस्तारासाठी या निधीचा वापर करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे.
आता दुसऱ्या लाटेतून देश बाहेर निघत असताना भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढण्यासाठी अतिरिक्त 23 हजार कोटींच्या निधीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत या मोठ्या गोठा करण्यात आले आहेत. विशेषता या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने आपले धोरण आखत असल्याचे सिद्ध केले आहे.
Published on: 09 July 2021, 09:19 IST