आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामध्ये बनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे. तसेच सरकारने कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गायींच्या या तीन जाती संभाळल्यास करोडपती व्हाल,रोज देऊ शकतात 50 लिटरहून अधिक दूध
कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात आला आहे.
तसेच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार आहेत. पुणे येथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली, चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार, अशा प्रकारे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे.
८५० रुपयांची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आला समोर...
लंपी रोगामुळे पांगरा येथे अनेक जनावरे दगावली,शासकीय पशुसंवर्धन खात्याच्या डाॅक्टरांचे दूर्लक्ष
आता शुगर फ्री तांदूळ विकसित होणार, शास्त्रज्ञांचे काम सुरू
Published on: 13 June 2023, 01:59 IST