महाविकास आघाडी सरकारने पाणंद रस्ता बाबत मोठा निर्णय घेतला आहे. मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतरस्ते नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे अवघड होते. वाहतुकीमुळे अनेक नगदी पिके घेता येत नाहीत.
मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेमार्फत रस्त्यांचे जाळे उभे करणे गरजेचे आहे. आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे. 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवाय एमआरईजीएसच्या कुशल-अकुशल नियमांच्या कचाट्यातून पाणंद रस्त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मान उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांना मिळाला आहे.
1 किलोमीटर रस्त्यासाठी 24 लाख रुपये
1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. आता पक्के शेतरस्तेच झाले नाहीत. एमआरईजीएस अंतर्गत एका किलोमीटरसाठी 5 लाख रुपयेही मिळत नव्हते. मात्र, या योजनेतून भरीव निधी आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे काम हे दर्जेदार होणार आहे. शिवाय उर्वरीत रस्ते उभारणीसाठी लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.
शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होत असत. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने मोठे नुकसान होत असत. आता मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून आता रस्ते केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी शेतरस्ते मोकळे करण्याची मोहीम राबवल्याने या योजनेला अधिक बळ मिळाले आहे.
Published on: 30 January 2022, 12:38 IST