News

7th Pay Commission: रकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना मोठी बातमी दिली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने ट्विट करून याबाबत माहिती दिली.

Updated on 17 August, 2022 2:04 PM IST

7th Pay Commission: सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना मोठी बातमी दिली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने ट्विट करून याबाबत माहिती दिली. (Increase in inflation allowance)

महाराष्ट्र सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के झाला आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2022 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. महागाई भत्त्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात ३ टक्के वाढीसह अधिक पगार मिळणार आहे.

English Summary: Big decision of Shinde government, increase in inflation allowance
Published on: 17 August 2022, 02:03 IST