News

देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 14 October, 2020 12:24 PM IST


देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने  याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा  सणांच्या  कालावधीत डाळी महाग होतात, पण  आता सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकार डजवळपास पाच लाख टन डाळींची आयात करणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटीने २०२०-२१ साठी उडीद आणि तूर डाळींची  आयात कोटा यादी जारी केली आहे. सरकारने चार लाख टन तूर डाळीची आयात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ४ लाख टन तूर डाळ आयात करावी लागणार आहे. यासाठी  आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात आली आहेत.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक झालेल्या  पावसाचा परिणाम हा तूर पिकावर होणार आहे. यामुळे उत्पन्न दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर तूर  आणि उडीद डाळ यांच्या  किमती अलिकडच्या काळात सर्वाधिक वाढल्या आहेत. एक महिन्यापुर्वी ८० ते ९० रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता २० ते २५ रुपयांनी महाग झाली आहे. मिळालेल्या अहवालानुसार, सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१९ पर्यंत १८.७ लाक टन डाळीची बाहेरून खरेदी केली होती. तर २०८७-१९ मध्ये २५.३ लाख टन डाळ आयात तेली होती, असे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले होते.

दरम्यान डाळींचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोषक घटकांचा साठा  डाळींमध्ये असतो. मोठ्या  प्रमाणावर  कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियम असते. डाळीत असलेल्या  पोषक घटकांमुळे WHO ने डायबिटिस आणि हृदयरोगासाठी फायदेशीर मानले आहे. आजारांमध्ये  डाळी खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. डाळी या प्रोटिन्सच्या मुख्य स्त्रोत आहेत. डाळीत फायदेशीर तव्व आहेत. त्यात टॅन्सिनस सुद्धा असतात. डाळीत  असलेले एन्टी ऑक्सीडंट्स शरीरासाठी  फायदेशीर असतात. त्यामुळे  कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळते.

English Summary: Big decision of Modi government, possibility of reduction in prices of pulses
Published on: 14 October 2020, 12:22 IST