News

राज्यात नवीन सरकार येऊन काही दिवसच झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक निर्णय घेत आहेत. असे असताना आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.

Updated on 17 August, 2022 11:14 AM IST

राज्यात नवीन सरकार येऊन काही दिवसच झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक निर्णय घेत आहेत. असे असताना आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.

यामध्ये पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देखील मिळणार आहे. आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण देखील मिळणार आहे. याबाबत मागणी केली जात होती.

शिंदे गटातील 8 मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून

या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यामुळे या सणावर दुःख कोसळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक तरुणांचा यामध्ये निधन झाल्याचे अनेकदा घडले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले. यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 
दुहेरी दिलासा! सीएनजी ६ रुपयांनी तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त; पहा आजचे दर...
सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने आणि चांदी इतक्या रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...

English Summary: Big decision of Eknath Shinde
Published on: 17 August 2022, 11:14 IST