News

सांगली जिल्हा बँकेने एक निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅँकेची वाढती थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदार शेतकरी, विविध सहकारी संस्थांसाठी वेगवेगळ्या ओटीएस योजना राबवण्यास बॅँकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

Updated on 20 March, 2022 11:55 AM IST

शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँका महत्वाच्या मानल्या जातात. शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम याठिकाणी केले जाते. असे असताना आता सांगली जिल्हा बँकेने एक निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅँकेची वाढती थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदार शेतकरी, विविध सहकारी संस्थांसाठी वेगवेगळ्या ओटीएस योजना राबवण्यास बॅँकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

या सभेकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. थकबाकीदारांना सवलत देतानाच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही व्याजात दोन टक्के रिबेट देणार असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी सांगितले आहे. काल ही सभा पार पडली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना मदत करण्यासाठी बॅँकेने शेती कर्ज वसुलीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकरिता विकास सोसायटयांना वसुली प्रोत्साहन निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज थक तारखेपासून सहा टक्के सरळ व्याजाने आकारणी करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांकडून दंडव्याज व अन्य कोणतेही चार्जेस वसूल केले जाणार नाही. याचा लाभ १४ हजार ६८४ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांच्याकडून सहा टक्के व्याजाने ५५.७८ कोटी रूपये वसूल होणार आहे. यात विकास सोसायट्यांना ४१.८३ कोटींचा तोटा होणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी सोसायट्यांना साडेचार टक्के दराने व्याज जिल्हा बॅँक देणार आहे.

याबाबत बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी माहिती दिली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने बड्या नेत्यांच्या संस्थांचे थकीत कर्ज 'राइट ऑफ' करण्याचा घेतलेला निर्णय तूर्त मागे घेतला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बॅँकेने शेती व बिगर शेती थकीत कर्जासाठीसाठी सामोपचार कर्ज परत फेड, तडजोड व पुनर्गठन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेत सात वर्षात थकीत कर्जाची परतफेड करायची आहे. बॅँकेच्या टॉप ३० कर्जदारांसह अन्य कर्जदारांचा यात समावेश आहे.यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते. यामुळे आता शेतकऱ्यांना किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक..
बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेत घुसले आणि...
'असानी' चक्रीवाद वाढवणार शेतकऱ्याचे टेन्शन, राज्यात चक्रीवादळामुळे गारपीट आणि पावसाची शक्यता

English Summary: Big decision for farmers in district bank, farmers will benefit ..
Published on: 20 March 2022, 11:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)