राज्यात यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. आता साखर आयुक्तांनी गाळप हंगाम संपल्याचे जाहीर केले. मात्र अजूनही ऊस शिल्लक असल्याचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. हा हंगाम मोठ्या कसोटीचा होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अनेकांनी आपला ऊस पेटवून दिला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे पुढील काळात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून आता प्रशासनाने तयारी केली आहे. तसेच काही निर्णय घेतले आहेत.
यामध्ये आता आगामी गाळप हंगामात प्रति दिवसाची गाळप क्षमता ही 25 हजार टनांनी वाढवली जाणार आहे. शिवाय ऊसाचे क्षेत्र किती आहे? हे समजण्यासाठी काही अँप निर्मिती केली जाणार आहे. ज्याप्रमाणे ई-पीक पाहणीतून पिकांच्या नोंदी केल्या जातात त्याचप्रमाणे आता सातबाऱ्यावर ऊसाची नोंदही घेतली जाणार आहे. यंदा 6 महिने हंगाम सुरु राहूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम होता.
त्यामुळे आगामी काळात लवकर गाळप सुरु केले जाणार आहे तर हार्वेस्टरची संख्या देखील वाढवली जाणार आहे. यामुळे या अडचणी येणार नाहीत, असेही सांगितले जात आहे. गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेला गाळपाचा हंगाम आता कुठे संपुष्टात आला आहे. राज्यात तब्बल 200 साखर कारखाने सुरु होते. शिवाय गाळप क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप ह्या साखर कारखान्यांनी केले आहे. मात्र तरी देखील अनेकांचे ऊस शिल्लक राहिले काहींनी पेटवून दिले.
साखर कारखाने बंद, ऊस अजूनही शिल्लक, आता 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
सध्या शिल्लक उसासाठी राज्यातील अजून तीन साखर कारखाने हे सुरु आहेत. प्रशासनाला आलेले अनुभव आणि ऊस उत्पादकांची झालेली गैरसोय पाहता आगामी हंगामासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. यामुळे आता पुढील काळात तरी हा प्रश्न सुटणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकजण आता ऊस लावताना विचार करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..
या नोटा तुमच्याकडे आहेत? असतील तर तुम्ही लखपती झालाच, याठिकाणी मिळतात लाखो रुपये..
अजित पवारांच्या घराबाहेरील झाडांच्या फांद्या तोडण पडले महागात, गुन्हा दाखल
Published on: 17 June 2022, 11:27 IST