या महिन्यात कांद्याच्या दरामध्ये एवढा काय बदल झालेला आहे ज्याने की शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा सुद्धा चुरा झालेला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचा प्रति क्विंटल दर हा ३ हजार २०० रुपये होता मात्र मार्च महिन्याच्या अंतिम टप्यात कांद्याचा प्रति क्विंटल दर हा ८०० रुपये वर येऊन ठेपलेला आहे. कांद्याच्या दरात लहरीपणा काय असतो हे प्रत्यक्ष आता शेतकऱ्यांना दिसू लागले आहे. खरीप हंगामातील लाल कांदा सध्या अंतिम टप्यात आहे जे की उन्हाळी कांद्याची सुद्धा बाजारात आवक सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात ज्या प्रमाणत आवक सुरू होती त्यापेक्षा आवक कमी आहे तरी सुद्धा आपणास दर कमी होताना पाहायला भेटत आहेत. कांद्याची मागणी नसल्याचा हा परिणाम आहे असे कांदा व्यापारी सांगत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड बाजारसमितीमध्ये जी परिस्थिती चालू आहे तीच परिस्थिती सोलापूर च्या कांदा मार्केटमधे आणि लासलगाव मार्केटमध्ये सुरू आहे.
खेडच्या महात्मा फुले मार्केटमध्ये 20 हजार कट्ट्यांची आवक :-
कांद्याच्या मुख्य बाजारपेठेत सध्या अशा प्रमाणत कांद्याची आवक सुरू आहे. जे की खेड बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केटमध्ये २० हजार कट्ट्यांची कांद्याची आवक झाली आहे. झालेली आवक जास्त प्रमाण नसताना सुद्धा कांद्याला फक्त ९०० ते १ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. या अशा कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. अजून उन्हाळी कांदा हा शेतातच आहे जे की सुगीचे दिवस आल्यामुळे काढणी रखडलेली आहे. उद्या जर या कांद्याची आवक बहजारपेठेत झाली तर दर एवढे पडताना दिसतील की शेतकरी धास्ती खाईल.
खर्च अधिक उत्पन्न कमी :-
मागील महिन्यात ज्या कांदा उत्पादकांनी कांद्याची विक्री केली आहे त्या कांदा उत्पादकांना एकरी २ ते ३ लाख रुपयांचे उत्पन्न भेटले आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कांद्याची आवक जरी घटली आहे तरी सुद्धा मागणी नसल्याने अशी परिस्थिती उदभवली आहे. लासलगाव, सोलापूर कांदा मार्केट मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यामुळे आता कांद्याचे भाव कधी सुधारणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असल्याने कांदा वावरात ठेवणे सुद्धा अशक्य आहे.
सोलापुरात केवळ 15 क्विंटललाच अधिकचा दर :-
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाच्या दृष्टीने कांद्यासाठी सोलापूर मार्केट हे महत्वाचे आहे. गुरुवारी सोलापूर मार्केट मध्ये कांद्याची ३७ हजार क्विंटल ची आवक झाली आहे मात्र त्यामधील १५ क्विंटल ला १ हजार ५०० रुपये असा दर मिळाला आहे तर राहिलेल्या सर्व कांद्याला ८०० रुपये प्रति क्विंटल असा दर भेटलेला आहे. मार्च महिना उलटला की कांद्याचे भाव वाढतील असे सांगण्यात आले आहे. मात्र आता कांद्याची साठवनुक करायची कुठे असा प्रश्न पडलेला आहे.
Published on: 25 March 2022, 03:45 IST