News

सर्वांचे लक्ष लागलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. संपुर्ण कोरोना काळात ज्या क्षेत्राने देशाच्या अर्थवस्थेला तारलं, त्या शेती क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Updated on 04 February, 2022 12:43 PM IST

सर्वांचे लक्ष लागलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. संपुर्ण कोरोना काळात ज्या क्षेत्राने देशाच्या अर्थवस्थेला तारलं, त्या शेती क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतमालावर प्रकिया क्षेत्राला प्रोस्तासहन देणार. देशांतर्गत तेल बियाणं उत्पादन वाढवणार. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार. आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल. रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला देशभर चालना दिली जाईल.

शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. तसेच 5 नदीजोड प्रकल्पाची ब्लू प्रिंट तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा नदी जोड प्रकल्प केला जाणार आहे. कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पासाठी मोठी मदत केली जाणार आहे. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

तसेच नैसर्गिक शेतीसाठी चालना देण्यात येणार आहे. देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल. कर्जासंबंधी घोषणा- नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले

याचबरोबर, जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी केली जाणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणर आहे. तरुण शेतकऱ्यांना अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाणार आहेत.

English Summary: Big announcements in the field of co-operative agriculture in the budget, read the full announcement regarding agriculture ...
Published on: 01 February 2022, 12:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)