News

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. असे असताना आता अजून एक मोठी योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. आपण बघत असतो की, शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर.

Updated on 22 February, 2022 2:26 PM IST

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. असे असताना आता अजून एक मोठी योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. आपण बघत असतो की, शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर यामध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांनाही आधुनिक शेती करण्यासाठी मदत करण्यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो त्यांना भाडेतत्वावर ट्रॅक्टर आणून शेतीची पूर्वमशागत तसेच विविध शेत कार्य पार पाडावी लागतात तर काही शेतकरी बैलांच्या साह्याने शेतीची पूर्वमशागत व इतर शेत कार्य करतात, मात्र या पारंपारिक शेती पद्धती मुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन पदरी पडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील मोदी सरकार गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी एका योजनेअंतर्गत सबसिडी देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

याबाबत माहिती अशी की ही सबसिडी 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' या नावाने दिली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर दिले जातील. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देते. यामुळे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकतात. यातील उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. यामुळे आता मूळ किमतीच्या केवळ निम्मी किंमत भरावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या या योजने व्यतिरिक्त देशातील अनेक राज्य सरकारे संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान देत असते. यामुळे ही एक मोठी संधी आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना मात्र एक ट्रॅक्‍टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एक एप्लिकेशन करावे लागेल. काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, बँकेचे पासबुक तसेच बँकेचे स्टेटमेंट देखील लागते. याव्यतिरिक्त आपले पासपोर्ट साईज फोटो देखील अनिवार्य आहेत. यामुळे गरजू शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

English Summary: Big announcement of Modi government! Now you can buy a tractor of any company at half price ...
Published on: 22 February 2022, 02:26 IST