News

आज राज्याचा 2022-23या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आली आहे.

Updated on 11 March, 2022 7:22 PM IST

आज राज्याचा 2022-23या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठीबऱ्याच प्रकारच्या घोषणा या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केल्या.यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारीठरेल अशी आहे.ती म्हणजेविदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही विभाग सोयाबीन आणि कापूस पिकाचे प्रमुख केंद्र आहेत.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचीकापूस व सोयाबीनउत्पादकता वाढावीयासाठीमूल्य साखळी विकसित करण्यात यावी म्हणून तीन वर्षात एक हजार कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणाअजित पवार यांनी केली.या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन ची लागवड केली जाते.त्यामुळे या दोन्ही पिकांची उत्पादकता वाढावी आणि त्यादृष्टीने मूल्य साखळी बळकट करता यावी म्हणून एक हजार कोटींची घोषणा ही महत्त्वपूर्ण ठरेल.

तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे भूविकास बँकांचे कर्जमाफ करण्याची सर्वात मोठी घोषणा करण्यात आली.त्यासोबतच पशुवैद्यकीय रुग्णालय आला दहा कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. राज्यामध्ये आता बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने जिल्हानिहाय   आता पटाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बैल जोडी चे महत्व वाढले असून अर्थकारणाला चालना मिळत आहे. बैलाच्या आरोग्याच्यादृष्टीने मुंबईतील बैल घोडा पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी दिले जाणार आहे.

त्यासोबतच केंद्राच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जात असून या मधील त्रुटी या वारंवार केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहेत. असे असताना देखील यामध्ये बदल केला नाही तर राज्य सरकारने हा पर्याय निवडणार  जाणार आहे. गुजरात व अन्य काही राज्य या योजने मधून बाहेर पडलेली आहेत. त्याचप्रमाणे आघाडी सरकार विचार करीत आहे.

English Summary: big announcement for vidharbh and marathwada region farmer in financial budget
Published on: 11 March 2022, 07:22 IST