News

शेती,माती,नाती,संस्कृती जपत राज्याच्या-देशाच्या राजकारणात आपली ठळख ओळख निर्माण करनारा

Updated on 19 March, 2022 4:57 PM IST

शेती,माती,नाती,संस्कृती जपत राज्याच्या-देशाच्या राजकारणात आपली ठळख ओळख निर्माण करनारा

कृपाछत्र ग्रामविकास समिती चे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव साहेब

राजकारणामध्ये स्वतःची सरशी ठेवण्यासाठी दुसर्‍याचा आलेख सदोदीत कमी केला जातो. कार्यकर्ता हा कायम सतरंजी उचलणाराच राहावा याची सर्व तजवीज करणारे नेते पाहिजे तेवढे आहेत पण कार्यकर्त्याला पोटाशी धरुन त्याला मोठ करण्यासाठी बापासारखी आभाळ माया देणारा पुढारी क्वचीतच जन्माला येतो आणि असा पुढारी आपल्या नशिबाला येणे यालाही भाग्य लागतं.असा पुढारी म्हणजे राजकारणातील माझे कृपाछत्र खा.प्रतापराव जाधव साहेब म्हणावे लागतील. 

आपल्या प्रेमळ, उच्च शिक्षित,सुसंकृत,प्रसंगी धीर गंभीर, हासतमुख स्वाभावाने महाराष्ट्रच्या राजकारणातील पटलावर प्रस्थापितांच्या नाकीनव आणुन महाराष्ट्रातील असंख्य जनतेचे तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व न्याय मिळवुन देण्यासाठी अहोरात्र काम करतात.  

आपल्या सर्वांचे नेते भुमिपुत्र खा.प्रतापराव जाधव साहेब !

या धग धगत्या तडफदार नेत्या बद्दल दोन शब्द.

गोरगरीब,शेतकरी-शेतमजूर, मोलमजुरी करणार्‍या असंख्य जनता जनार्धनासह सुशिक्षित बेरोजगारांना एकत्र करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत ’न्याय’ देणारा कार्यकर्ता ते अडचणीत,संकटात स्वतःहून धावून जात त्यांना आधार देणारा नव्या दमाचा, नव्या प्रेमाचा, दिलदार मनाचा, चेहरा म्हणजे खा.प्रतापराव जाधव साहेब होय.

खा.प्रतापराव जाधव साहेब म्हणजे असंख्य दुबळ्या जनतेचा अश्रूंचा बांध आणि आवाज. प्रसंगी कठोर भूमिका, अनेकदा प्रेमळपणा, पण उत्तर फक्त खा.प्रतापराव जाधव होय. त्यांचे मार्गदर्शक एक वाक्य आहे - ‘फळाची अपेक्षा न ठेवता कार्याचा दिवा तेवत ठेवा’, त्याचा प्रकाश नेहमी तुमच्या कामाची गाथा गायली जाईल.

आज खा.प्रतापराव जाधव साहेब संपूर्ण महाराष्ट्र भर फिरतात. त्यांच्या दैदीप्यमान कार्यामुळे विदर्भ,मराठवाड्यातील युवकांनी साथ त्यांना दिली आहे. 

महाराष्ट्रतील मोठ्या नेत्यांना लाजवेल अशी उर्जा, बोलण्याची लकब, आपल्या भारदस्त परखड वाणीतून लोकांना आकर्षित करणारे, तरुणांना राजकारण करण्या आधी शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करून मगच राजकारण करण्याचा प्रेमळ सल्ला देणारे नेतृत्व म्हणजे 

खा.प्रतापराव जाधव साहेब होय.

आज बुलढाणा जिल्ह्याचे खासदार असूनही अत्यंत साधं राहणीमान, उच्च विचार या तत्वावर चालणार नेतृत्व महाराष्ट्रातल्या असंख्य युग पुरुषांचा विचार

व कार्याचा वारसा लाभला आहे. तोच अखंड पणे चालवणारा सुशिक्षित, कार्यक्षम लोकप्रिय नेतृत्व म्हणजे भुमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव साहेब.

आपल्या प्रेमळ, उच्च शिक्षित,सुसंकृत,प्रसंगी धीर गंभीर, हासतमुख स्वाभावाने महाराष्ट्रच्या राजकारणातील पटलावर प्रस्थापितांच्या नाकीनव आणुन महाराष्ट्रातील असंख्य जनतेचे तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व न्याय मिळवुन देण्यासाठी अहोरात्र काम करतात.

आपला प्रगतीचा आलेख हिमालयाची उंची गाठो.आपण अंगी साकारलेले व्रत, उत्तरोत्तर दृढ होवो.

एकंदरीत सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणार्‍या माझ्या नेत्याच्या भविष्यातील यशासाठी आणि समाजसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा.

शेतशिवार ते संसद, 

 यशस्वी वाटचाल.

नांगरधारी शेतकरी लोकसभेचा मानकरी

 

आपलाच - विशाल जावळे पाटील

मो- 9359200670

English Summary: Bhumiputra, the height of the sky, who brought honor to the voice of Buldhana in Delhi.
Published on: 19 March 2022, 04:53 IST