जालन्यात 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडत आहे. या आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भुमिका मांडली. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
इस्लामपूर येथील सभेत मनोज जरांगे बोलत असताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसींनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे. यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे .मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा भुजबळांनी अपमान केला आहे. हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू .आपल्यात झुंज लावून राजकिय फायदा घेतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
Published on: 18 November 2023, 06:59 IST