News

दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. आता हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळाला. हा कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता, मात्र आता तो सुरु झाला आहे.

Updated on 28 December, 2022 12:05 PM IST

दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. आता हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळाला. हा कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता, मात्र आता तो सुरु झाला आहे.

भीमा पाटस कारखान्याचे अवघ्या आठ दिवसात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन निघाले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम १५ डिसेंबर २०२२ रोजी ऊस मोळी टाकून गाळप हंगामाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गाळप चालू बंद होत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या.

असे असताना मात्र आता कारखाना सुरु झाला आहे. आता दिवसाला तीन ते साडेतीन हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. तर सरासरी ७.८० टक्के साखर उतारा निघत आहे. यंदाचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्याचा कारखाना व्यवस्थापकांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंधरा दिवसांनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. एम. आर. एन. भीमा शुगर अँड पावर लि. (निराणी ) संचलित यांच्याकडे सध्या हा कारखाना आहे. जेव्हा हा कारखाना सुरु झाला होता, तेव्हा येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत पेढे वाटले होते.

ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा

या कारखान्यावरून तालुक्याच्या राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडत असतो. असे असताना हा कारखाना बंद असताना यावरून अनेकदा आरोप झाले. यामुळे हा कारखाना बंद होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर हा कारखाना आता सुरु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
Beed Farmers; शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर उचलले पैसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील घटना..
बारामतीत बेकायदा कत्तलखान्याबाबत नगरपालिकेला नोटीस, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिले होत आदेश
जानेवारीत कापसाचे भाव वाढणार, शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा..

English Summary: Bhima Patas track, 19 thousand metric tons sugarcane milled 8 days,
Published on: 28 December 2022, 12:05 IST