News

Rice Rate : भारत तांदूळ पुढील आठवड्यापासून बाजारात ५ किलो आणि १० किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारने पाच लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी दिला आहे. यासोबत सरकार आधीपासून भरत आटा २७.५० रुपये प्रति किलो आणि भारत डाळ (चन्ना) ६० रुपये किलो दराने विकत आहे. बाजारातील अफवा दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Updated on 03 February, 2024 2:32 PM IST

Bharat Rice Update : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यामुळे केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ‘भारत राइस’ ब्रँड अंतर्गत तांदूळ किरकोळ बाजारात २९ रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. तसंच तांदूळ व्यापाऱ्यांना देखील तांदळाच्या साठ्याची माहिती देण्यात आले असल्याचं आलं आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तांदळाच्या विविध जातींच्या निर्यातीवर बंदी असतानाही गेल्या वर्षभरात तांदळाचे किरकोळ आणि घाऊक बाजारातील दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तांदूळ विकला जाणार

तांदळाच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने दोन सहकारी संस्था नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) तसेच किरकोळ साखळीद्वारे किरकोळ बाजारात उत्पादनाची विक्री सुरू केली आहे. केंद्रीय भंडार अनुदानित 'भारत तांदूळ' २९ रुपये प्रति किलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही भारत तांदूळ विकला जाणार आहे, असं संजीव चोप्रा यांनी सांगितले आहे.

भारत तांदूळ पुढील आठवड्यापासून बाजारात ५ किलो आणि १० किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारने पाच लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी दिला आहे. यासोबत सरकार आधीपासून भरत आटा २७.५० रुपये प्रति किलो आणि भारत डाळ (चन्ना) ६० रुपये किलो दराने विकत आहे. बाजारातील अफवा दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवण्याची सरकारची सध्या कोणतीही योजना नाही. भाव खाली येईपर्यंत निर्बंध कायम राहतील, असं चोप्रा यांनी सांगिलते आहे.

गरज भासल्यास सरकार तांदळाच्या साठ्याची मर्यादा ठरवू

तांदळाच्या साठ्यावर सरकार मर्यादा घालणार का, असे विचारले असता चोप्रा म्हणाले की, भाव कमी करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. गरज भासल्यास तांदळाची साठा मर्यादा निश्चित करण्याचा विचार सरकार करेल, असे त्यांनी म्हटले आहे. तांदूळ वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आहेत. तांदळाच्या किमतींवर लक्ष ठेवण्यासाठी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि प्रक्रिया करणाऱ्यांना सरकारकडून पुढील शुक्रवारपासून सरकारी पोर्टलवर विविध श्रेणींमध्ये त्यांचा साठा जाहीर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तांदूळ बासमती असो की नॉन-बासमती किंवा परतून केलेला आणि तुटलेला तांदूळ असो, व्यापाऱ्यांना तो सरकारी पोर्टलवर जाहीर करावा लागणार आहे.

English Summary: Bharat Rice Government will sell rice in the market at Rs. 29 kg Efforts to reduce inflation
Published on: 03 February 2024, 02:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)