News

कोणतीही निवडणूक आली, की उमेदवारांकडून मतदारांना मोफत जेवण,

Updated on 23 October, 2022 4:12 PM IST

कोणतीही निवडणूक आली, की उमेदवारांकडून मतदारांना मोफत जेवण, दारू नि पैशांचे वाटप केलं जातं. ही बाब लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोफत जेवण, दारू वाटप गुन्हा मतदारांना हॉटेलात मोफत जेवण देणं, दारू पाजणं गुन्हा ठरणार आहे.Liquor Distribution Crime Giving free food to voters in hotels, drinking alcohol will be a crime. पूर्वी मतदानाच्या 48 तासांआधी या गोष्टींना मनाई होती. आता त्यात आणखी वाढ केली जाणार असून, हा कालावधी 72 तासांचा केला जाणार आहे.

 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा निवडणूक आचार संहितेच्या कक्षेत समावेश असेल. मतदार यादीत नाव नसले, तरीही 18 वर्षांवरील तरुणांना निवडणूक आचार संहितेच्या या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

निवडणुकीत पैसे वाटपाच्या नियमाबाबत याआधीच अत्यंत कठोर नियम केलेले आहेत. मात्र, आता रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण देण्यावरही प्रतिबंध घातला जाणार आहे. अशा नियमाचा समावेश करण्याची निवडणूक आयोगाची पहिलीच वेळ आहे.

डिजिटल व्यवहारावर नजर आता डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यावरही निवडणूक आयोगाची करडी नजर असेल.मतदारांना डिजिटल ट्रान्जेक्शन केल्यास तो गुन्हा मानला जाणार आहे.

English Summary: Beware! Is it a crime to distribute food and liquor during the campaign? Strict rules of Election Commission
Published on: 23 October 2022, 04:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)