सध्या शेतकरी बंधू पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरत आहेत. अत्याधुनिक शेती करताना शेतकरी बंधू त्यांना शेती कामासाठी उपयोगी आणि सोयीस्कर पडणाऱ्या अशा यंत्रांचा वापर करत आहेत. मात्र यंत्रांचा वापर करत असताना अनेक दुर्घटना घडतात. कधी कधी दुर्घटना इतक्या गंभीर असतात की, यात त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो.
अशीच एक घटना घडली आहे. ही घटना आहे परभणीतील. उन्हाळी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर चलित रोटावेटर चालवत होता. मात्र रोटावेटर बंद न करता रोटावेटरपाशी काम करत असताना चालकाचा फिरत्याब्लेड च्या फटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या रेणापूर इथे ही घटना घडली. रविवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास ही दुःखद घटना घडली आहे.
सध्या शेत मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पाथरी तालुक्यातील रेणापूर येथे रोटावेटरचे काम चालू होते. यावेळी या यंत्रणेची कॉटन पीन पडली. ती पीन बसवण्यासाठी गजानन नेमाणे वय वर्ष २४ यांनी चालत्या यंत्रणेतच ही पीन बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रोटावेटरमध्ये हात,डोके अडकल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कराड, सुरेश कदम, सुरेश वाघ यांनी भेट दिली. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
खरीप हंगाम : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय...
महागाईचा उडाला भडका; गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ
ब्रेकिंग : आता देशात होणार डिजिटल जनगणना, अमित शाह यांची मोठी घोषणा
Published on: 10 May 2022, 04:07 IST