News

आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे गावात- खेड्या-पाड्यात राहतात. तेथे राहून आपल्या घराच्यांना आणि आपल्या कुटुंबाला सांभळत असतात. गावात शिर गणना केली तर निम्म युवक हे पदवी झालेले किंवा बारावी पास केलेले सापडतील. त्यांची गणना सुशिक्षित बेरोजगार म्हणून करत असते. यातील काही आपल्या शेतीत काम करतात काही अजून कामाच्या शोधात आहेत. कोणते काम करावे याची कल्पना त्यांना सुचत नाही. अशा युवकांसाठी हा लेख फार फायदेशीर आहे.

Updated on 21 April, 2020 11:32 AM IST


आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे गावात- खेड्यापाड्यात राहतात. तेथे राहून आपल्या घराच्यांना आणि आपल्या कुटुंबाला सांभळत असतात. गावात शिर गणना केली तर निम्म युवक हे पदवी झालेले किंवा बारावी पास केलेले सापडतील. त्यांच्या गणना सुशिक्षित बेरोजगार म्हणून करत असते.  यातील काही आपल्या शेतीत काम करतात काही अजून कामाच्या शोधात आहेत. कोणते काम करावे याची कल्पना त्यांना सुचत नाही. अशा युवकांसाठी हा लेख फार  फायदेशीर आहे. या लेखात तुम्हाला व्यवसाय साकरण्याच्या काही कल्पना आम्ही देत आहोत. यातून मी स्वत एखाद्या व्यवसायाचे मालक व्हाल आणि गरजूंना तुम्ही कामही देऊ शकता.  शिवाय तुम्ही नक्कची मालामाल होणार.

या व्यवसायासाठी तुम्हाला गाव सोडयाची गरज देखील नाही. हो तुमच्या गावात तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करता येणार आहे.  ज्यांना शेतीसह व्यवसाय करायचा आहे तर काही हरकत नाही हे व्यवसाय तुमच्यासाठी पण आहे. या व्यवसायाचे वैशिष्ट्ये म्हणजे या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक फार कमी करायची आहे. पण यातून मिळणार नफा मात्र अमाफ आहे.


दूध संकलन केंद्र -

गावात पशुपालन मोठ्या प्रमाणात होत असते.  गायी - म्हैशींची संख्या अधिक असते.  यामुळे गावात दूध डेअरी असते, त्यात मोठ्या प्रमाणात दूध जमा केले जाते. या डेअऱ्या बऱ्याच वेळा दूध संकलन केंद्रातून दूध जमा करत असतात. यामुळे तुम्ही डेअरी व्यवसायापेक्षा संकलन केंद्र सुरू करा. शेतकऱ्यांकडून दूध घ्यायचे आणि दूध डेअरीला दूध पाठवायचे, यासाठी तुम्हाला डेअरीवाल्यांशी संपर्क ठेवावा लागेल.  दोघांमधील दुवा म्हणून तुम्ही काम करु शकता. शिवाय तुम्ही रिटेलमध्ये दूध देखील विकू शकता. दुधातील फॅट आणि इतर गोष्टींची गुणवत्ता मोजण्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी वजनाची मशीन ठेवावी लागेल.

सेंद्रिय भाज्या पिकवा आणि विका -  सध्या हायब्रीड खाण्यामुळे आपली प्रकृती खराब होत असते. यामुळे आहारात सेंद्रीय भाज्यांचा समावेश असावा  असा अनेकांचा ओढा असतो. तर तुम्ही आपल्या शेतात न काही रासायिनक खते वापरता पालेभाज्या, फळ भाज्यांचे उत्पादन करू शकता आणि त्यांची विक्री करु शकता.  एकदा का तुमच्या उपक्रमाची माहिती लोकांना समजली तर तुमच्याकडे ग्राहकांची रांग लागल्याशिवाय राहणार नाही.

पिठाची गिरणी -  गावातील लोक आपल्या शेतातील गहू पिठाच्या गिरणीवर दळत असतात. परंतु शहरातील लोक दुकानातून तयार पीठ घेत असतात. जर तुम्ही पिठाची गिरणी सुरू केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. याशिवाय तुम्ही त्या गिरणीचा उपयोग हळद, मिरची, पण दळू शकता. फक्त आपल्याकडे विज पुरवठा व्यवस्थीत हवा.

तेल मिल (Oil mills) - आईल मिल -  तेल गिरण्यांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील लोकांना तेल शुद्ध करण्यासाठी दूर ठिकाणी जावे लागते.  तर त्यांनी उत्पादित केलेल्या तेलबियांना कमी किंमतीत विकावे लागते. आपल्याकडे पुरेसे भांडवल असल्यास आपण ऑइल मिल सहज स्थापित करू शकता. लोक त्यांच्या शेतात सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे पिकवतात तेव्हा तुम्ही रोजच्या वापरा इतके तेल सहज काढू शकता.


पोल्ट्री व्यवसाय - पोल्ट्री व्यवसाय म्हटलं म्हणजे आपल्या समोर टोलेजंग वाडा, शेड येत असतं. परंतु  पोल्ट्रीसाठी मोठी जागा भरपूर पैसा हवा असतो असे नाही. तुम्ही कमी पैशातही पोल्ट्री सुरू करु शकता. आपल्या पडीत जागेवर तुम्ही पोल्ट्री सुरू करु शकता. सध्या कोरोना व्हायरसमुळे या व्यवसायावर संकट आले आहे. परंतु कोरोनाचे संकट गेल्यानंतर पोल्ट्री उद्योगाला नवीन भरारी येईल.

 

मत्स्य शेती (Fishery farm)

ज्याप्रमाणे तुम्ही पोल्ट्री व्यवसाय करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मत्स्य व्यवसायही सुरू करु शकता. पण यासाठी तुम्हाला पुरेशी जागा लागेल.  आपल्याकडे जागा असली तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता. कारण त्या जागेच्या उपयोग आपल्याला तलावासाठी किंवा तळ्यासाठी करावा लागेल. त्यात तुम्ही मत्स्य बीज त्यात सोडू शकाल.  या व्यवसाय़ातून तुम्ही बक्कळ पैसा कमावू शकता.

होलसेल खते विक्री केंद्र(Wholesale of fertilizer)

आपल्याला माहित आहे की खेड्यांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. खतांचा घाऊक साठा सुरू करणे म्हणजे चांगले उत्पन्न मिळविण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला संबंधित प्राधिकरणाकडून परवाना घ्यावा लागेल.असे काही फायदेशीर व्यवसाय होते जे आपण खेड्यांपासून सुरू करू शकता आणि खरोखर चांगले उत्पन्न मिळवू शकता. आपल्याला कोणत्याही विशिष्ट व्यवसायाबद्दल तपशीलवार माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा,  आपल्या चौकशी नुसार संबंधित व्यवसायाविषयी आम्ही लेख प्रसारित करु.

 

English Summary: Best small seven Business Ideas, you can get huge profit
Published on: 21 April 2020, 11:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)