News

गोंदिया जिल्ह्यात आता सर्वत्र भात लावणीचे काम सुरु आहे. कुऱ्हाडी गावचे रहिवासी शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू होते. शेतातील भात लावणी उरकून मजूर घरी परत होते. तेव्हा अचानक मधमाशांनी हल्ला केला.

Updated on 01 September, 2023 2:26 PM IST

गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावातील शेतमजूरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याच ५ मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी आहेत. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्लामुळे परिसरात खळबळ माजली होती.

गोंदिया जिल्ह्यात आता सर्वत्र भात लावणीचे काम सुरु आहे. भात लावणी उरकून मजूर घरी परत होते. तेव्हा अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान यातील काही शेतमजूर यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली व शासकीय योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मधमाशांचा हल्ला हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत बसत नाही पण आणखी कोणत्या शासकीय योजनेत हे बसवून मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी असे प्रयत्न आमचे राहणार असल्याचे गोरेगांव चे तहसीलदार नागपुरे यांनी सांगितले.

English Summary: Bees attack farm workers 5 people died
Published on: 05 August 2023, 01:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)