News

बीड जिल्ह्यातल्या चौसाळा (Chousala) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून (Farmers Bank Account) परस्पर पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Updated on 28 December, 2022 10:46 AM IST

बीड जिल्ह्यातल्या चौसाळा (Chousala) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून (Farmers Bank Account) परस्पर पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या (District Central Co-Op. Bank Ltd, Beed) चौसाळा शाखेत हा प्रकार घडला आहे. येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळू दगडु पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यावर महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत 50 हजार रूपये जमा झाले होते.

पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरची रक्कम परस्पर उचलण्यात आल्याचे समोर आले आहे. पैसे उचलणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बीडच्या पोलीस अधीक्षकांडे (Superintendent of police) केली आहे.

गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा, गायरान हक्क परिषदेत मागणी

दरम्यान, या सर्व शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेजही आले होते. परंतू या शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तीने उचलल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी बँकेत विचारणा केल्यावर मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..

या घटनेमुळे बँकेत देखील आपले पैसे सुरक्षित नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कसून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना एकच धक्का बसला. यामुळे चौकशीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या;
बारामतीत बेकायदा कत्तलखान्याबाबत नगरपालिकेला नोटीस, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिले होत आदेश
जानेवारीत कापसाचे भाव वाढणार, शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा..
ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा

English Summary: Beed Farmers; Mutual withdrawal money farmers' accounts, incident district central bank branch..
Published on: 28 December 2022, 10:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)