राज्यात खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. मराठवाडा समवेतचं विदर्भातील हे एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लातूर मधील उदगीर मध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करणारे सोया प्लांट लावण्यात आले आहेत.
एक-दोन नव्हे तर तब्बल 3 सोयाबीन प्रक्रिया प्लांट जिल्ह्यात सुरू केले गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं निश्चितच चांगभलं होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा:-कृषी वैज्ञानिकांचा सल्ला! जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी उन्हाळी हंगामात 'या' पिकांची लागवड करा
आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अनुषंगाने सोयाबीनची साठवणूक केली असल्याने उदगीर बाजारपेठेत सोयाबीनची आवक मंदावलेलीचं बघायला मिळत आहे. बाजारपेठेत सोयाबीनला कमी दर प्राप्त होत असतो त्यामुळे पुढील हंगामापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याऐवजी थेट सोयाबीन प्लांटला विक्री करतील असे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे.
हे देखील वाचा:-अरे महावितरणा! पिकांची होळी होऊ दे पण या मुक्या जनावरांना प्यायला पाणी कसं द्यायचं? असं म्हणत शेतकऱ्यांनी........!
सध्या सोयाबीनला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे मिळत असलेला दर परवडण्यासारखा नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना बघायला मिळत आहे. यामुळे आगामी काळात तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आपला सोयाबीन सोया प्लांटवर विक्री करतील अशीही तज्ञांकडून आशा व्यक्त करण्यात आली आहे. मित्रांनो उदगीर तालुक्यात, बामणी पाटी, करडखेल पाटी व उदगीर शहराजवळील नळेगाव रस्त्यावर सोया प्लांट उभारले गेले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार या तीन सोयाबीन प्लांट वर रोजाना जवळपास पंधरा हजार क्विंटल सोयाबीनची प्रक्रिया होणार आहे. यामुळे या तिनी प्लांट मालकांनी परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून त्यांचे नाव, मोबाईल नंबर, बँक खाते व इतर तपशील जाणून घेतला आहे.
या सोयाबीन प्लांट वर बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील हंगामात उदगीर एपीएमसीमध्ये सोयाबीनचा अकाल पडणार असून सोया प्लांट वर शेतकरी बांधव सोयाबीन विक्री करताना बघायला मिळू शकतात.
सोया प्लांट मालक सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करतील असे सांगितले जात आहे त्यामुळे शेतकरी बांधव सोयाबीनची विक्री सोया प्लांट कडेच अधिक करतील असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. सोया प्लांट मुळे एकंदरीत उदगीर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चांगभलं होणार असल्याची प्रतिक्रिया आता समोर येऊ लागली आहे.
Published on: 16 March 2022, 07:35 IST