News

शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत फळबाग लागवडीकडे आकृष्ट झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे. फळबाग पिकांपैकी डाळिंब एक महत्त्वाचे पीक आहे, डाळिंब पिकाच्या लागवडीसाठी राज्यात चहूकडे अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. कमी पाण्यात यशस्वी उत्पादन देणारे हे पीक राज्यातील माळरानावर देखील मोठ्या ऐटीत बहरत असताना नजरेस पडत होते. डाळिंब पिकातून उत्पादन खर्च वजा जाता हाती मोठी रक्कम पडत असल्याने बळीराजा डाळिंब लागवड करण्याकडे वळत होता.

Updated on 17 January, 2022 11:59 AM IST

शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत फळबाग लागवडीकडे आकृष्ट झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे. फळबाग पिकांपैकी डाळिंब एक महत्त्वाचे पीक आहे, डाळिंब पिकाच्या लागवडीसाठी राज्यात चहूकडे अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. कमी पाण्यात यशस्वी उत्पादन देणारे हे पीक राज्यातील माळरानावर देखील मोठ्या ऐटीत बहरत असताना नजरेस पडत होते. डाळिंब पिकातून उत्पादन खर्च वजा जाता हाती मोठी रक्कम पडत असल्याने बळीराजा डाळिंब लागवड करण्याकडे वळत होता.

डाळिंब म्हणजे हमखास नफा असे असतानादेखील यावर्षी राज्यात डाळिंबाच्या क्षेत्रात लक्षणीय घट नमूद करण्यात आली आहे. यावर्षी डाळिंबाची सरासरीपेक्षा खूपच कमी लागवड केली गेली असल्याचे समोर येत आहे. भारतीय डाळिंब संघाने एका आकडेवाडीत स्पष्ट केले आहे की यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा पाच टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कधी अतिवृष्टी तर, कधी अवकाळी व तयार झालेले दूषित वातावरण यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत होती त्यामुळेच शेतकऱ्यांनी यावर्षी डाळिंब पिकाकडे पाठ फिरवल्याचे समजत आहे. परराज्यात आपल्या राज्यापेक्षा थोडी परिस्थिती वेगळी आहे तेथे डाळिंब पिकासाठी गेल्या अनेक वर्षापासून पोषक वातावरणाची निर्मिती होत आहे, त्यामुळे तेथे डाळिंब पिकातून दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे या एकत्रित तयार झालेल्या समीकरणामुळे गुजरात व राजस्थान या राज्यात डाळिंबाची लागवड लक्षणीय वाढली आहे. यावरुन हे समजते की, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका फक्त वावरत होते असलेल्या पिकांना बसत आहे असे नाही तर यामुळे आगामी हंगामात उत्पादनासाठी सज्ज होणाऱ्या पिकांना देखील याचा फटका बसत आहे. शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे अनियमित पावसाचा आणि वातावरणाच्या बदलाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हा फळबाग पिकांवर होत असतो, डाळिंबाचे पीक देखील या गोष्टीसाठी अपवाद ठरत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा डाळिंबाला देखील मोठा फटका बसत असतो. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त फटका राज्यातील फळबाग पिकांना बसल्याचे समोर आले आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षे व आंबा पिकांच्या उत्पादनात कमालीची घट घडणार असल्याचे समजत आहे. 

डाळिंबाचे पिक कमी पाण्यात, आणि माळरानावर देखील बहरणारे पीक आहे. मात्र असे असले तरी डाळिंब जोपासण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करणे अनिवार्य असते, डाळिंब पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी महागड्या फवारण्यांची आवश्यकता असते, यासाठी अपार कष्ट देखील करावे लागतात मात्र, अपार हाल-अपेष्टा सहन करून, हजारो रुपयांचा खर्च करून देखील वातावरणाच्या बदलामुळे डाळिंबाचे पीक साधत नसेल तर यापेक्षा पारंपरिक पिकांची लागवड केलेली बरी अशी शेतकरी राजाने मनोमनी खूणगाठ बांधल्याने राज्यात यंदा सरासरीपेक्षा 5% डाळिंबाची कमी लागवड नजरेस पडत आहे. राज्यात उत्पादन वाढीच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून डाळिंब पिकाची लागवड केली जात होती. राज्यात डाळिंबाचे 1 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी डाळिंब म्हणजेच लाल सोन्याच्या लागवडीत घट नमूद करण्यात आली आहे. लाल सोन्याच्या लागवडीतून सोन्यासारखा पैसा कमावण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो, आणि खर्च करून देखील अनेकदा पदरी निराशा पडत असल्याने लाल सोन्याच्या लागवडीत घट नमूद करण्यात आली आहे. डाळिंबासाठी वाढणारा उत्पादन खर्च आणि प्राप्त होणारे उत्पन्न यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक प्रकर्षाने जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाकडे पाठ फिरविली असल्याचे समजत आहे.

डाळिंबासाठी आधीच हजार रुपयांचा उत्पादन खर्च करावा लागतो, आणि त्यात तेल्या रोग, मर रोग, पिन होल बोरर या रोगांच्या व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट गेल्या अनेक वर्षापासून ठरलेलेच आहे. तसेच या रोगांच्या नियंत्रणासाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने उत्पादन खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकंदरीत बदलत्या हवामानामुळे उत्पादन खर्चात गगनभरारी वाढ झाल्याने डाळिंब लागवडीला उतरती कळा लागली असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभरातून समोर येत आहे.

English Summary: because of this pomegranate cultivation is decreased in this year
Published on: 17 January 2022, 11:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)