News

नामदेव यांच्या सोयाबीनची तीन महिन्यापूर्वीच काढणी उरकली मात्र त्यांच्या वावराला रस्ता नसल्याने सोयाबीन मार्केटमध्ये सोडा त्यांच्या घरी देखील दाखल होऊ शकला नाही. त्यांच्या वावरात वाहन जाण्यासाठी रस्ता नाही तसेच त्यांना त्यांच्या शेजारी शेतकऱ्याने देखील वाहन ने-आण करण्यासाठी रस्ता न दिल्याने त्यांचा सोयाबीन वावरातचं पडून राहिला आणि आत्ता तो सोयाबीन अक्षरशः कुजला आहे.

Updated on 18 March, 2022 5:40 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आला असल्याचे आपण बघितलेच आहे. मात्र केवळ निसर्गाचा लहरीपणाचं शेतकऱ्याच्या जीवावर उठला आहे असे नाही शेतकरी राजा अजूनही अनेक सुलतानी संकटांमुळे भरडला जात आहे. असंच काहीसं सध्या लातुरातील एका शेतकऱ्यांबाबत घडलं आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या हत्तरगा येथे एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

नामदेव सावंत या शेतकऱ्यांने खरिपात सोयाबीन ची लागवड केली होती. त्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन चांगला पिकवला त्याची काढणी केली मळणी देखील आपटली परंतु सोयाबीन विक्रीसाठी बाजारात जाऊ शकला नाही. नामदेव यांच्या सोयाबीनची तीन महिन्यापूर्वीच काढणी उरकली मात्र त्यांच्या वावराला रस्ता नसल्याने सोयाबीन मार्केटमध्ये सोडा त्यांच्या घरी देखील दाखल होऊ शकला नाही.

त्यांच्या वावरात वाहन जाण्यासाठी रस्ता नाही तसेच त्यांना त्यांच्या शेजारी शेतकऱ्याने देखील वाहन ने-आण करण्यासाठी रस्ता न दिल्याने त्यांचा सोयाबीन वावरातचं पडून राहिला आणि आत्ता तो सोयाबीन अक्षरशः कुजला आहे. शेवटी रस्त्याअभावी नामदेव यांचे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

नामदेव यांनी जवळपास तीन महिने सोयाबीनची चांगल्या पद्धतीने साठवणूक केली मात्र मध्यंतरी अवकाळी पावसामुळे तसेच आता पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे नामदेव यांचा सोयाबीन कुजून खराब झाला आहे. नामदेव यांनी डोळ्यादेखत त्यांचा सोयाबीन खराब झाल्याने तहसील कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

नामदेव यांना सुमारे 40 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले होते मात्र रस्त्याअभावी त्यांना एवढ्या मोठ्या उत्पादनातून एक छदाम देखील मिळालेला नाही. रस्त्याबाबत यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने नामदेव यांनी तहसील कार्यालयात रस्ता दिला जावा अशी मागणी केली आहे. नामदेव यांनी तात्पुरती रस्त्याची सोय व्हावी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे मात्र पोलिसांनी तक्रार न मिळाल्याचे सांगत एक प्रकारे या प्रकरणातून पळ काढला आहे.

नामदेव यांनी वीस वर्षांपूर्वी बारा एकर शेतजमीन विकत घेतली होती. मात्र, 2002 मध्ये त्यांनी यातील तीन एकर शेत जमीन प्रभावती माने यांना विकली. जमिनी घेतल्या नंतर या संबंधित शेतकऱ्यांनी नामदेव यांचा रस्ता अडवला आणि त्यामुळेच आज नामदेव यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. त्यांनी यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज त्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

नामदेव व त्यांच्या पत्नी यांनी त्यांना शेतीसाठी रस्ता उपलब्ध न करून दिल्यास आत्मदहनाचा इशारा देखील यावेळी प्रशासनास दिला आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची बाब अशी की, नामदेव सावंत यांच्याकडे रस्त्याबाबत मूळ कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांनी नायब तहसीलदारास कागदपत्र दाखवले असून तहसीलदारांनी त्यांना रस्ता मिळवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. आता नामदेव यांना केव्हा रस्ता मिळतो हे विशेष बघण्यासारखे राहील.

संबंधित बातम्या:-

कांद्याचा भाव तब्बल दीड हजारांनी घसरला! कांदा उत्पादक शेतकरी सापडला पुन्हा अडचणीत

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे धाव; खतांच्या किमती वाढतील म्हणून चिंतेत म्हणुन सांगितला 'हा' तोडगा

महत्वाचे! खरीप हंगामात खतांचा तुडवडा भासणार, म्हणुन आताच करा 'हा' उपाय; नाहीतर………!

English Summary: because of the road this farmers soybean got damaged learn more about it
Published on: 18 March 2022, 05:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)