नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जिल्ह्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण नजरेस पडत आहे त्यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकाला तर नुकसान होणार नाही मात्र कांदा पिकाला मोठी हानी पोहचू शकते असे जाणकार लोक आपले मत व्यक्त व्यक्त करत आहेत. ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या पिकाला धोका पोहोचणार नाही मात्र जर वातावरण अजून काही दिवस असेच कायम राहिले तर गव्हाच्या पीक हे वेळेआधी फुलोऱ्यात येईल आणि त्यामुळे पाहिजे तसे दर्जेदार उत्पादन गव्हाच्या पिकातून प्राप्त होणार आहे.
अवकाळी मुळे जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे.तसेच येत्या काही दिवसातवातावरण असेच राहणार असून पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीसाठी तयार झाला असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कांदा काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शिफारस केली गेली आहे.
तसेच द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसताच लगेच ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे नाहीतर लाखोंचे नुकसान त्यांना सहन करावे लागू शकते. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव लवकरनजरेस पडत असतो त्यामुळे वेळीच यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. म्हणून द्राक्ष बागायतदारांनी यासाठी लवकरात लवकर उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सर्वत्र विशेषता कसमादे पट्ट्यात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीची लगबग नजरेस पडत आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागवड केलेल्या कांद्याला योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. असा सल्ला कृषी वैज्ञानिक यावेळी देताना दिसत आहेत. मागील चार पाच दिवसापासून कसमादे परिसरात ढगाळ वातावरण नजरेला पडले आहे एवढेच नाही तर काल शनिवारी बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे याचा सर्वात जास्त फटका कांदा आणि द्राक्ष बागांना बसणार असल्याचे जाणकार लोक मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे जे शेतकरी बांधव आता कांदा लागवड करीत आहेत त्यांनी ताबडतोब बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे. तसेच द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षबागेवर व्यवस्थित नजर ठेवून डाऊनीचा प्रादुर्भाव दिसताच डाऊनी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
Published on: 09 January 2022, 12:49 IST