News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये गणपती मंडळांना भेटी दिल्या. पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या वतीने रविवारी देखाव्याचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका टिप्पणी केली.

Updated on 25 September, 2023 2:12 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये गणपती मंडळांना भेटी दिल्या. पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या वतीने रविवारी देखाव्याचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका टिप्पणी केली.

असे असताना राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांना उसाला दर चांगला मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धडपडणारा प्रतिनिधी आहे. पुढच्या वेळी खासदार होऊनच या, अशा शुभेच्छा शाहू छत्रपती यांनी शेट्टींना दिल्या. यामुळे चर्चा सुरू आहे.

सध्या आत्ताचे राज्यकर्ते महाराजांचे नाव घेऊन जनतेला लुटा, पण आमचा वाटा टाका असे म्हणतात. कारखानदार व त्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकार घेते, अशी टीका शेट्टी यांनी केली. तसेच ऊस दरावरून ते आक्रमक आहेत.

मोठी बातमी! माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केशवराव जगताप यांची निवड

यावेळी उद्योजक नितीन दलवाई, कविता पोवार, सरदार पार्टील यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उत्सव प्रमुख केदार सूर्यवंशी, अनिल ढवण, अजित पोवार आदी उपस्थित होते. दरम्यान शाहू छत्रपती यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहे.

शेतातील शेतीपूरक व्यवसायाच्या बांधकामाचा कर रद्द करावा, ग्रामपंचायतीकडून कोणत्या सुविधा नसताना कर का द्यायचा?

राजू शेट्टी यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यामुळे आता 2024 च्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची जोरदार तयारी त्यांनी केली आहे.

कृषी जागरणचा बहुप्रतिक्षित मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया (MFOI) पुरस्कार सोहळ्यापूर्वी कृषी विद्यापीठांशी सहयोग

English Summary: Be MP next time! Good luck to Raju Shetty in front of Ganapati Bappa...
Published on: 25 September 2023, 02:12 IST