News

जगभरात दररोज सात हजार चारशे लोकांना सर्पदंश होऊन जवळजवळ २२० ते २८० रुग्णांचा एका दिवसात मृत्यू होत आहे.

Updated on 26 April, 2022 10:26 AM IST

शेतात काम करताना, तसेच गडकिल्ल्यांवर फिरत असताना,ट्रेकिंग करत असताना, धरण,तलाव तसेच डोंगरमाथ्यावरील अडगळीच्या ठिकाणी सर्पदंशाचा धोका अधिक असतो. विशेषतः ग्रामीण भागात सर्पदंशाच्या भयानक घटना घडत असतात. भारतात दरवर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होण्याच्या घटना घडतात तर जगभरात दरवर्षी चार लाखांपेक्षा जास्त लोकांना सर्पदंश होऊन कायमचे शारीरिक आणि मानसिक अपंगत्व वाट्याला येते. भारतात सरासरी पन्नास हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत असलेल्याच सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्वेक्षणातून अजून एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे जगभरात दररोज सात हजार चारशे लोकांना सर्पदंश होऊन जवळजवळ २२० ते २८० रुग्णांचा एका दिवसात मृत्यू होत आहे. सर्प शेतातील उंदीर खातो अन्नधान्याची होणारी नासधूस थांबवतो त्यामुळे बऱ्याचदा साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. मात्र स्वरक्षणासाठी सर्प दंश करीत असतो.

मे ते ऑगस्ट या दरम्यान आपल्याकडे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असताना दिसतात. साप चावल्यावर बऱ्याचदा त्यासंदर्भात कोणतीच कल्पना नसल्यामुळे आपण काय केले पाहिजे हे कळत नाही. साप चावल्यावर वैद्यकीय उपचार घेणे गरजेचं आहे. मात्र वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत काही घरगुती प्रथमोपचार घेणंही तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात आधी आरोग्य यंत्रणेस फोनद्वारे रुग्णासंबंधी पूर्वसुचना देऊन सतर्क करावे. प्रथोमोपचार करताना साप चावलेल्या रुग्णास मोकळ्या जागेत घेऊन जावे त्याला धीर द्यावा व कोणतीही हालचाल न करण्यास सांगावे.असे केल्याने विष पसरणार नाही.

जर रुग्णाच्या पायाला सर्पदंश झाला असेल तर पायाला आवळपट्टी बांधावी आणि जर हाताला सर्पदंश झाला असेल तर हाताला आवळपट्टी बांधावी. आवळपट्टी बांधताना ती जास्त घट्ट बांधू नये. सर्पदंश झाल्यामुळे पीडित व्यक्तीला खूप त्रास होत असतो अशावेळी त्या व्यक्तीचे डोकं २-३ माणसांनी घट्ट धरून ठेवावे. साप कोणता आहे किंवा त्याच वर्णन डॉक्टरांना सांगणे जेणेकरून उपचार करण्यास सोयीस्कर होईल.

हे उपचार करत असताना रुग्णाला कोणत्याही प्रकारचे गावठी औषध देऊ नये, दंश केलेला भाग कापू नये, भोंदू बाबाकडे जाऊन बळी पडू नये, जागेचे विष तोंडाने काढू नये तसेच रुग्ण अर्धवट शुद्धीवर असताना त्याला पाणी किंवा अन्न देऊ नये या सगळ्या सावधगिरीने पाळल्यास धोका कमी होतो आणि रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या;
शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात
ऐका बुलडोझरची कहानी! काय आहे बुलडोझरचे खरे नाव आणि केव्हा झाले पहिल्यांदा हे यंत्र तयार?
बातमी अतिशय कामाची! तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करत आहे का? तपासा अगदी दोन मिनिटात

English Summary: Be careful! 'This' period of snake bites;
Published on: 26 April 2022, 10:26 IST