News

खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचीदेखील कामाची लगबग सुरु झाली आहे. सध्या जनावर टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. शेतीसाठी बैल,गायी, म्हशी,शेळ्यांचे असलेलं महत्व आपणा सर्वांनाच माहित आहे

Updated on 20 June, 2022 3:20 PM IST

खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचीदेखील कामाची लगबग सुरु झाली आहे. सध्या जनावर टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. शेतीसाठी बैल,गायी, म्हशी,शेळ्यांचे असलेलं महत्व आपणा सर्वांनाच माहित आहे. शेतातील कामांसाठी यांचा वापर होतो शिवाय बरेच शेतकरी बंधू तर दुग्धव्यवसाय म्हणूनदेखील पशुपालन करतात. मात्र अशा जनावरे चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच.

जनावर टोळीने सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा शिवारातूनच शेतात दावणीला बांधलेले तीन बैल आणि दोन लहान बैल अशी एकूण पाच जनावरांची चोरी केली आहे. चोरी झाल्याची घटना रविवारी समोर आली असता संबंधित शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रकरणात एका अज्ञाताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हनुमंतखेडा शिवारात शेतकरी विजय शामराव निकम यांनी गट क्रमांक 138 मधील शेतात तीन बैल आणि दोन लहान बैल दावणीला बांधलेली होती. शनिवारी काही अज्ञातांनी रात्रीच पाचही जनावरांची दावण सोडून चोरी केली. ही घटना शेतकरी विजय निकम यांच्या लक्षात येताच त्यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन खरीप हंगामात बैलांची चोरी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

आर्थिक फटका
या प्रकरणामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तीन वर्षांचे तीन बैल ज्यांची 60 हजार रुपये इतकी किमंत होती शिवाय 20 हजार आणि 18 हजार रुपये किमंत असलेल एकूण शेतकऱ्याचे पाच बैल चोरीला गेले आहेत. एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

'साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची अघोरी लूट केली'; शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषदेचे आयोजन

शेतकरी शेतातच रात्र जागून काढू लागले आहेत. शिवाय सोयगावप्रमाणेच पिंप्रीअंतुर भागात सुनील लाडके यांच्या गट क्र 79 मधून एक गाय चोरी झाल्याचे समोर आले आहे. या गायीची अंदाजे किंमत ही चाळीस हजार इतकी आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात तब्बल सहा जनावरांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! 'या' देशात दिलं जातंय औषध म्हणून कोंबड्यांना भांग
विमा कंपनीला दणका; २०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

English Summary: Be careful! Animal herd active again; Economic loss to farmers
Published on: 20 June 2022, 03:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)