News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ मे रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर यावेळी चर्चा सुरू होती. मात्र या सभेला सुरवात होताच लाईट गेली.

Updated on 13 May, 2022 3:43 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ मे रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर यावेळी चर्चा सुरू होती. मात्र या सभेला सुरवात होताच लाईट गेली. आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपर्क तुटला. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक  अचानक थांबली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी एकच धावपळ केली आणि अवघ्या काही मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत झाला.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाला नसल्याचा दावा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. वीजपुरवठा खंडित झाला नाही. मंत्रिमंडळाची बैठक संपली आणि बैठकीनंतर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला . काही मिनिटांसाठी मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला होता. मात्र मंत्रिमंडळाची बैठक आधीच सुरळीत पार पडल्याचे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. दरम्यान, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यामध्ये कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष कृती आराखड्यासाठी ३ वर्षात १००० कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ४२ लाख हेक्टर कापूस पिकाखाली आणि ४६ लाख हेक्टर सोयाबीन पिकाखाली आहे आणि विविध कारणांमुळे या प्रमुख पिकांची उत्पादकता देशाच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे.

त्याचप्रमाणे या दोन पिकांच्या बाबतीत असे आढळून आले आहे की तालुक्यातील काही शेतकऱ्यांची योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता खूप जास्त आहे परंतु त्याच तालुक्यात आणि त्याच कृषी हवामान क्षेत्रात राहणाऱ्या इतर शेतकऱ्यांची उत्पादकता खूपच कमी आहे. राज्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि टंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्यातील २८१ गावांना व ७३० वाड्यांना २७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 
Pm Shramyogi Maandhan: सरकारकडून प्रति महिना मिळते 3,000 रुपये पेन्शन, वाचा सविस्तर या योजनेबद्दल

English Summary: Battigul lost contact with the Chief Minister during the Cabinet meeting; And so on
Published on: 13 May 2022, 03:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)