News

बी ए एस एफ ही जागतिक पातळीवरील रसायने, इंडस्ट्रियल सोलुशन त्यासोबतच सरफेस टेक्नॉलॉजी, न्यूट्रिशन अँड केअर आणि शेतीविषयक उपाय योजना कंपनी तर्फे भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी एक्सपोनस कीटकनाशक लॉन्च करण्यात आले आहे.

Updated on 17 April, 2022 10:29 PM IST

बी ए एस एफ ही जागतिक पातळीवरील रसायने, इंडस्ट्रियल सोलुशन त्यासोबतच सरफेस टेक्नॉलॉजी, न्यूट्रिशन अँड केअर आणि शेतीविषयक उपाय योजना कंपनी तर्फे भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी एक्सपोनस कीटकनाशक लॉन्च करण्यात आले आहे.

पिकांवरील जे  प्रमुख घटक आहेत त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन कार्यपद्धती असणारे एक्सपोनस हे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अळी व कीटक त्यांच्यावर नियंत्रण मिळावे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून वर्तमान रसायन विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती वर मात करण्यासाठी एक दमदार वेगवान व बहुआयामी साधन आहे.

नक्की वाचा:अरे व्वा! 'या' ठिकाणी LED TV मिळतोय मात्र साडे सात हजारात; लवकर खरेदी करा; ऑफर लिमिटेड पिरियडसाठी

एक्सपोणस कीटकनाशकाचा वापर फुलकिडे तसेच अळी वर्गीय व फुलकिडे यासारख्या त्रासदायक कीटकांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

या किटकनाशकाची शिफारस ही तेलबिया, डाळवर्गीय व भाजीपाला पिकांमध्ये दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे. कीटकनाशकांचा संपूर्णता हा नवीन आय आर एसी ग्रुप 30 द्वारे बाजारपेठेत सादर करण्यात आलेल्या पहिल्या संयुगापैकी एक्सपोनस कीटकनाशक आहे. या कीटकनाशकाला सध्या बाजारात असलेल्या कीटकनाशकांना बरोबर क्रॉस रेजिस्टन्स नाही. या कारणामुळे हे कीटकनाशक एक श्रेष्ठ दर्जाचे इन्सेक्टिसाईड  रेजिस्टन्स साठी उपयोग व व्यवस्थापन साधन आहे.

नक्की वाचा:Farming Business Idea: एकदा 'या' झाडाची लागवड कराच; मालामाल होणार म्हणजे होणार

एक्सपोनस या किटकनाशकाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे हे जलद गतीने पसरते व झटपट कार्य करून वेगवेगळ्या टप्प्यांवरील वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरील अनेक प्रकारच्या कीटकांवर झटपट नियंत्रण मिळवून अत्यंत चिवट प्रतिकारशक्ती झालेल्या कीटकांवर सुद्धा परिणामकारक ठरेल.(स्रोत-इंडिया दर्पण)

English Summary: basf launch exponus insecticides that effective on harmful insect
Published on: 17 April 2022, 10:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)