Baramati : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिकंण्याचा मानस भाजपने ठेवला आहे. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी २०२४ च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होईल आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भोरमध्ये सकाळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला यावेळी आगामी निवडणुकीत बारामतीत परिवर्तन होईल, असं म्हंटलं आहे.
प्रल्हादसिंह पटेल बोलताना म्हणाले की, भोरमध्ये मी मागच्या वेळीही आलो होतो. भाजप कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरील तयारी केली आहे आणि शक्तीकेंद्र प्रमुखांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती यामुळे मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. जलजीवन मशिनच्या माध्यमातून आम्ही देशातील ६० टक्के परिवाराला पाणी देण्यात यशस्वी ठरलो आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा विरोधक जिंकतात, तेव्हा ते गप्प राहतात आणि जेव्हा ते निवडणुका हरतात, तेव्हा ते ‘ईव्हीएम’चा मुद्दा काढतात. संजय राऊतांना विचारा की जेव्हा तुम्हा जिंकता, तेव्हा मशिन आमच्या ताब्यात नव्हत्या का. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा गप्प राहतात आणि हरल्यावर मशिनमध्ये गडबड आहे, असा आरोप करतात.
आगामी २०२४ च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होईल आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केला आहे.
Published on: 09 April 2023, 01:26 IST