News

महाराष्ट्रात आणि देशात आगाप पेरण्यांचा बहुतांशी हरभऱ्याची कापणी-मळणी पूर्ण झाली आहे.

Updated on 20 March, 2022 1:25 PM IST

महाराष्ट्रात आणि देशात आगाप पेरण्यांचा बहुतांशी हरभऱ्याची कापणी-मळणी पूर्ण झाली आहे. मात्र, मात्र हंगामाच्या प्रारंभी प्रतिकूल पाऊसमानामुळे ज्यांचा हरभरा लेट झाला होता, त्यांच्यापुढे अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. सध्या अवकाळीचे सत्र सुरू असल्याने लेट हरभऱ्याची कापणी मळणी आणखीन लेट होईल, असे शेतकऱ्यांनी कळवले आहे.

बाजारभावाचा कल काय राहणार? : आजघडीला चांगल्या गुणवत्तेचा हरभरा खुल्या मार्केटमध्ये ४५०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला जातोय, दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून ५२३० रु. प्रतिक्विंटल दराने आधारभावाने खरेदी सुरू आहे. १४ टक्के मॉईश्चर एक टक्के माती या अटीनुसार शेतकऱ्यांचा माल आधारभावाने खरेदी केला जात आहे. एकरी चार क्विंटल आणि प्रति शेतकरी कमाल ५० क्विंटलच्या मर्यादेत शासकीय खरेदी सुरू आहे. मात्र, उरलेल्या मालाचे काय करायचे असा प्रश्न आहे. जर मार्च ते जून दरम्यान नाफेडकडून मोठ्या प्रमाणावर हरभरा खरेदी झाली तर अतिरिक्त साठा कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जुलै नंतर खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर आधारभावापर्यंत सुधारण्याची अपेक्षा आहे.

देशाचे उत्पादन आकारमान किती? : यंदा संपूर्ण देशात ११६ लाख हेक्टर इतक्या विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. परंतु यंदा सरासरी एकरी उत्पादकता दहा टक्क्यांनी कमी राहणार असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आगाप अनुमानानुसार १३२ लाख टन हरभरा उत्पादन अपेक्षित आहे, मात्र प्रक्रियादार आणि त्यांच्या संघटनांकडून ९० ते ९५ लाख टनाचे अनुमान बांधले जात आहे. जर आपण प्रक्रियादारांचे अनुमान प्रमाण मानले आणि त्यात शिल्लक साठा (कॅरिओव्हर स्टॉक) जोडला तर देशात साधारण ११५ ते १२० लाख टनाचा हरभऱ्याचा पुरवठा राहणार आहे. त्या तुलनेत देशाची मागणी ही ९० ते ९५ लाख टन आहे. सामान्य स्थितीत देशात ८ लाख टनापर्यंत दरमहा हरभऱ्याचा खप होतो. 

या हिशोबाने यंदा जर नाफेडच्या माध्यमातून १५-१६ लाख टन हरभरा आधारभावाने खरेदी झाला तर मार्केटमधील सरप्लस कमी होईल. त्यामुळे तीन-चार महिन्यानंतर खुल्या बाजारातही हरभऱ्याचे भाव ५२३० रूपयांच्या आधारभाव पातळीपर्यंत पोचण्याची अपेक्षा आपण करू शकतो. २०१८-१९ मध्ये नाफेडने २१ लाख टनापर्यंत हरभरा खरेदी केला. मात्र, गेल्या दोन वर्षांत नाफेडने चार ते सहा लाख टनाच्या आसपासच हरभरा खरेदी केलाय. परंतु यंदा चालू वर्षांत ऐन हंगामातच हरभऱ्याच्या किंमती दबावात असल्याने नाफेडकडील हरभरा खरेदीत वाढ होण्याची अपेक्षा आहे...मागील वर्षांत हंगामाच्या प्रारंभी हरभऱ्याचे दर आधारभावाच्या आसपास राहत होते. त्यामुळे सरकारी खरेदीस प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र पुढे ऑफ सिजनमध्ये मात्र हरभऱ्याचे दर आधारभावाच्या खाली गेले होते. यंदाचे चित्र थोडे वगळे आहे.

महाराष्ट्र व गुजरातचा बोलबाला

प्रमुख राज्यांतील हरभरा लागवड व गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ-घट

महाराष्ट्र - २८ लाख हेक्टर ( वाढ १३ टक्के)

मध्यप्रदेश - २५ लाख हेक्टर (अल्पशी घट)

राजस्थान - २० लाख हेक्टर (स्थिर)

कर्नाटक - ११ लाख हेक्टर (अल्पशी घट)

गुजरात - ११ लाख हेक्टर (वाढ ३४ टक्के)

यंदा देशात ६ लाख हेक्टरने क्षेत्र वाढून सुद्धा पिकाचे एकूण आकारमान वाढताना दिसत नाही. त्याचे कारण आहे यंदाची लेट थंडी, धुके आणि रोगराईमुळे घटती एकरी उत्पादकता. देशातील हरभरा उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यापर्यंत घटण्याची मार्केटमध्ये चर्चा आहे.. देशातील आघाडीचे हरभरा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातही यंदा हरभऱ्याची उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत.

English Summary: Bapre chana area increases but production decreased
Published on: 20 March 2022, 01:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)