News

मुंबई: कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बँकांनी येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

Updated on 06 March, 2020 8:24 AM IST


मुंबई:
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बँकांनी येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले. कृषी क्षेत्रात कर्जपुरवठा अधिक होण्यासाठी कृषिमंत्र्यांनी बँकांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राज्य बँकर्स समितीचे एन. एस. देशपांडे, नाबार्डचे आर.बी.डिसूझा, योगेश गोखले, एसबीआयचे रिजनल मॅनेजर संतोष मोहपात्रा, एमएससीबीचे एस.बी.जाधव, व्ही.डी.जोशी, आयसीआयसीआय बँकेचे समीर कुलकर्णी, कृषी विभागाचे उपसचिव पी. डी. सिकंदर तसेच आयसीआयसीआय, नाबार्ड, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, एमएससीबी आदी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, बँकांनी लहान शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जपुरवठा करावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याकरिता प्रयत्न करावेत. कृषी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का, निकषाप्रमाणे त्यांनी रक्कम भरली का याचा आढावा संबंधित बँकांनी घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, असेही त्यानी यावेळी सांगितले. कृषी योजनाच्या बाबतीत धोरणात्मक बाबींसाठी सहकारमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असेही श्री. भुसे यानी सांगितले.

कृषी क्षेत्रात पतपुरवठा वाढविण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन बँकांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले. अल्प, अत्यल्प, व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व मध्यम मुदत कर्ज वितरण, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज देणे, कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करणे आदी विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

English Summary: Banks should be careful about getting crop loans during the kharif season
Published on: 04 March 2020, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)