News

मुंबई- सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती साधली आहे. नोकरी बरोबरच व्यवसायाचे क्षेत्र काबीज करण्यासाठी महिला पावले टाकत आहेत.

Updated on 17 August, 2021 6:44 AM IST

मुंबई- सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती साधली आहे. नोकरी बरोबरच व्यवसायाचे क्षेत्र काबीज करण्यासाठी महिला पावले टाकत आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रांनी पुढाकार घेतला आहे. आकर्षक व्याजदरासह व्यावसायिक कर्ज (loan) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणातून महिलांसाठी नवा मार्ग खुला झाला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया(state bank of india): स्त्री शक्ती व्यवसाय कर्ज:

टर्म लोनच्या स्वरुपात कर्ज उपलब्ध आहे किंवा स्त्री शक्ती पॅकेज अंतर्गत खेळते भांडवलाच्या पुरवठा देखील केला जातो. कर्जाची रक्कम कर्ज घेणाऱ्या व्यक्तिनिहाय भिन्न असू शकते. फर्म किंवा व्यवसायात किमान ५० टक्के मालकी असणाऱ्या महिलांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे. १० लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तथापि, १ कोटी रुपयांवरील कर्ज किंवा कर्ज घेणाऱ्याच्या स्थितीनुसार तारण आवश्यक आहे. व्याजदर : 11.20% आणि त्यापुढे

भारतीय महिला बँक : व्यवसाय कर्ज

योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांपर्यंतच्या व्यावसायिक कर्जासाठी दावा करू शकतात. संपत्ती सापेक्ष या कर्जाचा पुरवठा केला जातो.
रिटेल व उत्पादन क्षेत्रात व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या महिला उद्योजकांसाठी ही कर्ज सुविधा आहे. एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही.

 

स्टेट बँक ऑफ म्हैसूर : अन्नपूर्णा योजना

खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजकांना या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो.
या योजनेअंतर्गत रु. ५० हजार पर्यंत कर्ज प्राप्ती होऊ शकते. या रकमेची ३६ महिन्यांच्या कालावधीत महिनानिहाय हफ्ता भरावा लागू शकतो.
पहिल्या महिन्यासाठी EMI भरण्याची आवश्यकता नाही. या कर्ज रकमेतून किचन आवश्यक उपकरणे, गॅस कनेक्शन, कच्चा माल, वॉटर फिल्टर्स इ. खरेदी केली जाऊ शकते.
वयोमर्यादा : १८ ते ६० वर्षे

सिंध महिला शक्ती योजना : सिंडिकेट बँक

या योजनेअंतर्गत, लघु उद्योग, व्यावसायिक किंवा स्वयं-रोजगारित आणि क्रेडिस सुविधेमार्फत रिटेल ट्रेड करणाऱ्या महिला उद्योजकांना बँकेमार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी, महिला उद्योजकांना पाच कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात येते.
या योजेनेद्वारे वर्तमान किंवा नवीन व्यवसायासाठी सध्याच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी थेट अर्थसहाय्य दिले जाते किंवा १० वर्षापर्यंत टर्म लोनची सुविधा उपलब्ध आहे

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : सेंट कल्याणी योजना

महिलांना सहाय्य करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे कर्ज पुरवठा केला जातो. ग्रामीण महिला, लघु उद्योगातील महिला, स्वयंरोजगारित महिला, कृषी आणि अन्य सहाय्यक क्षेत्र, रिटेल ट्रेड आणि सरकार प्रायोजित योजना यामध्ये सहभागी महिलांना अर्थपुरवठा केला जातो.

English Summary: Bank provide loan facility for women enterpriser
Published on: 17 August 2021, 06:43 IST