News

महाराष्ट्रातील बावन्न बँकांच्या साडेसहा हजार पेक्षा जास्त शाखांमध्ये डिजिटल सातबारा फेरफार आणि खाते उतारा ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी राज्याच्या महसूल विभागाने बँक पोर्टल उपक्रम सुरू केला आहे. याबद्दलची माहिती इ फेरफार चे राज्य समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज वितरीत करण्यामध्ये सुलभता यावी हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिजिटल सातबारा बँकांसाठी सुरू केलेले वेबपोर्टल सध्या https://.g2b. mahabhumi.gov.in/banking-application/ या लिंक वर उपलब्ध आहे. या पोर्टल ची सेवा मिळवण्यासाठी 9-6-2019 अखेर 52 बँकांनी सामंजस्य करार केले आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल. त्यांनी शुक्रवार अखेर सहा लाख 90 हजार अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून घेतले आहेत.

Updated on 13 June, 2021 11:20 AM IST

  

 

 

 

 

महाराष्ट्रातील बावन्न बँकांच्या साडेसहा हजार पेक्षा जास्त शाखांमध्ये डिजिटल सातबारा फेरफार आणि खाते उतारा ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी राज्याच्या महसूल विभागाने बँक पोर्टल उपक्रम सुरू केला आहे. याबद्दलची माहिती इ फेरफार चे राज्य समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज वितरीत करण्यामध्ये सुलभता यावी हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिजिटल सातबारा बँकांसाठी सुरू केलेले वेबपोर्टल सध्या https://.g2b. mahabhumi.gov.in/banking-application/ या लिंक वर उपलब्ध आहे. या पोर्टल ची सेवा मिळवण्यासाठी 9-6-2019 अखेर 52 बँकांनी सामंजस्य करार केले आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल. त्यांनी शुक्रवार अखेर सहा लाख 90 हजार अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून घेतले आहेत. 

 

  • कोणत्या बँकांमध्ये सुरू केले हे पोर्टल

    • बँक ऑफ महाराष्ट्र
    • महाराष्ट्र ग्रामीण बँक
    • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक
    • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
    • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक
    • विदर्भ कोकण ग्रामीण बँक
    • गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    • कोटक महिंद्रा बँक
    • एच डी एफ सी बँक
    • अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    • सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    • औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    • पंजाब व सिंध बँक
    • जनता सहकारी बँक सातारा
    • स्टेट बँक ऑफ इंडिया
    • बँक ऑफ इंडिया
    • सिडको महाराष्ट्र
    • लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    • आयडीबीआय बँक
    • धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

 

  • पंजाब नॅशनल बँक
  • बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • शिवदौलत सहकारी बँक पाटण
  • पी डी पाटिल सहकारी बँक कराड
  • संगमनेर मर्चंट सहकारी बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • सुवर्णयुग सहकारी बँक
  • वारणा सहकारी बँक
  • ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • महा ऊर्जा
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

 

 

  • माणदेशी महिला सहकारी बँक मान जिल्हा सातारा
  • प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक
  • विश्वास सहकारी बँक नाशिक
  • हुतात्मा सहकारी बँक वाळवा सांगली
  • कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक सातारा
  • जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड वाई
  • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक
  • जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव
  • बीड जिल्हा मध्यवर्ती बँक बीड
  • व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी अहमदनगर
  • उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • सोपानकाका सहकारी बँक सासवड
  • विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
  • यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • कोल्हापूर अर्बन सहकारी बँक
  • सांगली अर्बन सहकारी बँक

 इत्यादी बँकांच्यासाडेसहा हजार शाखांमध्ये बँक फलटण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

English Summary: bank portal
Published on: 13 June 2021, 10:55 IST