News

मुंबई : बँक ऑफ बडोदाच्या देशातील विविध शाखांमध्ये पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, कामाचे स्वरुप, पगार, अनुभव याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Updated on 30 October, 2021 1:39 PM IST

बँक ऑफ बडोदाच्या देशातील विविध शाखांमध्ये पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, कामाचे स्वरुप, पगार, अनुभव याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरी अंतर्गत बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई ब्रांचमध्ये विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाच्या एकूण जागा ४ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही राष्ट्रीय बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराला कॉम्प्युटरच ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

बॅंक ऑफ बडोदाच्या पालघर जिल्हा आणि मुंबई उपनगरातील ब्रांचमध्ये ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ उमेदवारांची वयोमर्यादा ६४ वर्षांपेक्षा अधिक नसावी. तसेच तरुण उमेदवारासाठी वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षांदरम्यान असावी. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार रुपये दरमहापर्यंत पगार आणि १० हजारहून अधिक वेरिएबल पे दिला जाईल.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बड़ौदा, मुंबई मेट्रो उत्तर प्रदेश, तिसरा मजला, दीवान शॉपिंग सेंटरच्या मागे, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई ४००१०२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ३ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

English Summary: Bank of Baroda Recruitment 2021: Bank of Baroda graduates will get job opportunities, salary up to 25 thousand
Published on: 30 October 2021, 01:39 IST