सध्या गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात चांगली वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते. मात्र केळीला चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर होता. सध्या रमजान महिना येत असल्याने उत्तर भारतातील आणि अनेक देशातील केळीची मागणी वाढली असल्याने भाव देखील चांगला मिळत आहे.
तसेच केळीची कॉलिटी चांगली असल्याने दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रमजान महिना आणि इतर सणांमुळे केळीची मागणी अधिक वाढली आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला आहे.
दरम्यान, बाजारपेठेत केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे असताना मात्र पुरवठा कमी आहे. परदेशातही मागणी वाढल्याने आगामी काळात येणाऱ्या रमजान व इतर सण उत्सवामुळे केळीचे दर अजूनही वाढतील. विविध कारणांमुळे यावर्षी केळीच्या उत्पादनात घट झाली आहे.
Cashew: आफ्रिकेतील काजू, पंढरपूरमध्ये प्रक्रिया, ओझेवाडीचा शेतकरी मोळवतोय लाखोंचा फायदा..
बाजारपेठेत मागणी कायम असल्याने केळीचे दर कमी होणार नसल्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी सध्या समाधानी आहे. उत्तर महाराष्ट्रातील केळी भारतातच नव्हे, तर विदेशात देखील पाठवली जात असते.
उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव टाळा
गेल्या काही हंगामापासून केळीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नव्हता. यावर्षी केळीची आवक कमी असल्याने, रमजान महिना आणि इतर सणांमुळे केळीची मागणी अधिक वाढली आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल आहे.
किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक
एरंडीची लागवड आहे खूपच फायदेशीर, दुर्मिळ होत असताना मिळेल फायदा
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
Published on: 14 March 2023, 09:56 IST