जळगाव
खानदेशात कांदेबाग केळी पिकातून काढणी सुरू आहे. यंदा केळी काढणीच्या दिवसांमध्ये सणासुदीचे दिवस असल्याने केळीला चांगला उठाव कायम राहिला आहे. शिवाय कांदेबाग केळीची आवक खानदेशात कमी असते. यामुळे दर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.
सध्या स्थानिक किंवा राज्यातील विविध भागांत पाठवणुकीच्या केळीचे दर ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. किमान दर ८०० रुपयांवरच आहेत. केळीला उठाव कायम आहे.
दरम्यान, आता काही दिवसांतच श्रावण महिना सुरु होतोय. त्यामुळे पुढील महिनाभर केळीला चांगला दर राहण्याचा अंदाज जानकारांनी व्यक्त केला आहे. तसेच गौरी, गणपती, नवरात्रोत्सव, लागलीच दसरा व दिवाळीचा सण असणार आहेत. या सणासुदीला धार्मिक बाबींमध्ये केळीची मागणी असते. त्यामुळे दर चांगले राहतील.
Published on: 10 August 2023, 01:48 IST