1. बातम्या

वाढत्या तापमानामुळे जळगावमधील केळी उत्पादक चिंतेत

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
वाढत्या उष्णतेचा केळी पिकाला फटका

वाढत्या उष्णतेचा केळी पिकाला फटका

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ही उष्णता पिकांसाठीही परिणामकारक आहे. दरम्यान भावी हवामान बदलाचे परिदृश्य महाराष्ट्र, पश्चिम भारत या शीर्षकाखाली हवामानाविषयी अभ्यास करण्यात आला आहे.  खानदेशातही काही दिवस पावसाळी वातावरण होते, आता उष्णता वाढली आहे. गेले दोन दिवस उष्णता सतत वाढली आहे.

याचा फटका लहान व निसवलेल्या केळी बागांना बसत आहे. पिकांचा बचाव सिंचन, बागेभोवती उष्णता, वाऱ्यापासून बचावसाठी हिरवी जाळी लावणे, नैसर्गिक वारा अवरोधक याबाबतची कार्यवाही शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षी मे, जूनमध्ये लागवडीच्या बागांमध्ये निसवण पूर्ण झाली असून, अनेक बागांची काढणी सुरू आहे. या बागांमध्ये उष्णतेमुळे घड सटकणे, उष्ण वाऱ्यामुळे झाडे मोडून पडणे, अशी समस्या तयार झाली आहे. गेले दोन दिवस खानदेशातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले आहे.

 

यातच अनेक भागात वीज तोडणी मोहिमेने सिंचनाला फटका बसला आहे. तसेच काही भागात वादळी पाऊस झाल्याने रोहित्रांची यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. यामुळे सिंचनासंबंधीची कार्यावाही संथ आहे. या स्थितीत या बागांना वाचविण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे वीज उपलब्ध करुन घेत असून सिंचन करीत आहेत. नवती किंवा काढणीवरील केळी बागा जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा व शहादा भागात अधिक आहेत.

 

तर लहान बागा किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा जळगावमधील चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, धुळे, शिरपूर भागात आहेत. काढणीवर आलेल्या किंवा सुरू असलेल्या नवती बागा खानदेशात सुमारे ४५ हजार हेक्टरवर आहेत. इतर बागा सुमारे १३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात आहेत. जाणकरांच्या मते केळी बागांना ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान प्रतिकूल ठरत असते. लहान बागांमध्ये पश्चिम व दक्षिण भागातील झाडे होरपळण्यास सुरुवात झाली आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters