सध्या राज्यात सर्वत्र केळीला चांगला विक्रमी बाजारभाव मिळत आहे, मराठवाड्या पासून ते खानदेश पर्यंत सर्वत्र केळीला चांगला समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. असे असले तरी, या वाढत्या दराचा अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही. कारण की, तीन ते चार महिन्यांपूर्वी शेळीला अतिशय कवडीमोल दर प्राप्त होत होता, त्यावेळी केळीला मात्र तीन ते चार रुपये प्रतिकिलो असा मातीमोल दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील शक्य होत नसल्याचे सांगितले गेले होते, त्यावेळी बनलेल्या या विपरीत परिस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा रोटाव्हेटर फिरवून क्षतीग्रस्त केल्या तर अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा सोडून दिल्या.
मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की दिवाळीच्या कालावधीत केळीला मोठा कवडीमोल दर मिळत होता. त्यावेळी ला फक्त तीन ते चार रुपये प्रति किलो एवढाच दर मिळत होता, एवढेच नाही खोडवा उत्पादन घेतलेल्या पिकाला व्यापारी खरेदीच करत नव्हते. त्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकरी मोठ्या तोट्यात गेले. यामुळे अनेकांच्या डोक्यावर कर्ज झाले. खानदेशातील शेतकऱ्यांना देखील त्यावेळी लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगितले गेले. परंतु आता बाजारपेठेत केळीची आवक मोठी घटली आहे. त्यावेळी अनेकांनी केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्याने आणि अनेकांनी केळीच्या बागा सोडून दिल्याने बाजारपेठेत केळीचा पुरवठा खूपच कमी झाला आणि परिणामी मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने केळीच्या दरात मोठी सुधारणा बघायला मिळत आहे.
कृषी तज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत देशात सर्वत्र महाशिवरात्री व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर केळीला मोठी मागणी आहे. देशांतर्गत सणांमुळे केळीच्या मागणीत वाढ झाली असून परदेशातही केळीच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या देशात मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने केळीचे दर उच्चांकी वाढले असून सध्या देशात सर्वत्र 14 ते 17 रुपये प्रतिकिलो या दरम्यान केळीला बाजार भाव मिळत आहे.
बाजारपेठेत केळीला दर वाढले असल्याने ज्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत ते शेतकरी सध्या नशिबाला दोष देत आहेत. परंतु "तब पच्छताने से क्या होत जब चिडिया चुब जाए खेत" याप्रमाणे आता या शेतकऱ्यांनी पश्चाताप करून काहीच हाताला लागणार नाही एवढे नक्की.
Published on: 26 February 2022, 02:05 IST