आधीच महागाईत सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असताना आता अजून एक झटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भारतात तांदळाची किंमत पाच दिवसांमध्ये १० टक्क्यांनी वाढली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे भारतातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत होती. त्यामुळे देशांतर्गत गव्हाच्या किंमतीत वाढ होऊ लागली म्हणून केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. निर्यातीवर बंदी घालूनही देशभरातून भारतीय गव्हाला बरीच मागणी येत आहे.
आता गव्हाप्रमाणे भारत तांदळावरही बंदी घालेल या शक्यतेने बांगलादेशने मोठ्या प्रमाणावर तांदळाची आयात सुरु केली आहे. बांगलादेशने यंदा जून मधेच मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात सुरु केली. एवढंच नाही तर बांगलादेशने तांदूळ आयातीवरील सीमा शुल्क ६२.५ टक्क्यांनी कमी केले. त्यामुळे भारतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात तांदूळ बांगलादेशला निर्यात करत आहेत. याचा परिणाम असा की, भारतात तांदळाची किंमत पाच दिवसांमध्ये १० टक्क्यांनी वाढली.
शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ३६० डॉलर प्रती टनवर पोहोचल्या आहेत. किमती वाढल्याने पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या तांदळाची किंमत २० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यतादेखील वर्तवली आहे. या राज्यांमधून बांगलादेश सर्वाधिक तांदूळ आयात करतो.
अबब! शेतकऱ्याला सापडल्या नोटांनी भरलेल्या गोण्या; वाचा नेमकं पुढे काय झालं...
तांदळाच्या किंमती वाढण्याची कारणे
बांगलादेशने यावेळेस पहिल्यांदाच भारतातून सप्टेंबर-ऑक्टोबर ९ ऐवजी जूनमध्येच आयात करणे सुरू केले. गव्हाप्रमाणेच तांदळावरही भारत सरकार बंदी घालेल अशी बांगलादेशला भीती होती. म्हणून बांगलादेशने तांदूळ आयात शुल्कात ३७.५% ची कपात केली. त्यामुळे भारतीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर तांदळाची निर्यात करू लागले.
महत्वाच्या बातम्या:
Cotton management: कपाशीवरील लाल्या रोग, जाणून घ्या कारणे आणि त्यावरील सर्वोत्तम उपाय
आता रांगेत थांबण्याचे टेन्शन मिटणार!! CNG संपल्यावर एका कॉलवर मिळणार टाकी भरून
Published on: 29 June 2022, 03:19 IST