News

भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्लावर जाण्यासाठी ५ ते ६ नाले पार करुन जावे लागते. १८ जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले १७ पर्यटक अडकले होते.

Updated on 01 September, 2023 6:24 PM IST

कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात जुलै ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्लावर जाण्यासाठी ५ ते ६ नाले पार करुन जावे लागते. १८ जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले १७ पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बर्की धबधब्याकडेही पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने कासारी नदी पात्राबाहेर पडल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून धबधब्याकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील पंचगंगा नदी देखील बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली. पंचगंगेची इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. 

English Summary: Ban on going to Rangana fort in Kolhapur district
Published on: 20 July 2023, 02:58 IST