भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, पण बळीराजाला हवे तसे सुखाचे दिवस कधी आले नाहीत. निसर्गाचा असमतोलपणा आणि बाजारात न मिळणारा भाव यामुळे शेतकरी नेहमी कोंडीत सापडत असतो. दरम्यान सरकार आता कृषी क्षेत्रात बदल करत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून सरकार विविध योजना आणत आहे. जेणेकरून शेती व्यवसाय हा तोट्याचा न होता सगळ्यांसाठी फायद्याचा ठरावा. दरम्यान सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण शेतीशी संबंधित काही व्यवसाय आहेत, ज्याच्यामुळे शेतकरी आपले उत्पन्न नक्की दुप्पट करू शकतो.
डेअरी व्यवसाय - डेअरी व्यवसाय हा सर्वात्तम व्यवसाय आहे. यातून शेतकरी भरघोस नफा घेऊ शकतात. नाबार्डमार्फत आपल्याला कर्जाचीही मदत मिळत असते. यामुळे आपल्याकडे भांडवल कमी जरी असेल तरी आपण डेअरीचा व्यवसाय सुरु करू शकतात.
पोल्ट्री- शेती करताना केल्या जाणाऱ्या व्यवसायतील हा एक व्यवसाय आहे. योग्य योजना आणि निगा ठेवून हा व्यवसाय तुम्ही शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकतात. पोल्ट्रीसाठी अनेक मोठं मोठ्या बँका कर्ज देत आहेत. याचा फायदा घेऊन पोल्ट्रीचा व्यवसाय करु शकतात.
मत्स्य पालन - मत्स्य शेतीतूनही आपण चांगला नफा कमावू शकतात. जर एका एकराच्या जागेवर आपण तलाव बनवून मत्स्य शेती केली तर आपण वर्षाला ६ ते ८ लाख रुपयांची कमाई करु शकतात. विशेष म्हणजे या शेतीसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. आपण त्याच्या मार्फत हा व्यवसाय सुरू करु शकतात.
शेळीपालन - कमी खर्चात अधिक नफा देणारा व्यवसाय असेल तर हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरु करण्यास आपल्याला अधिक मजुरांचीही गरज नसते. शिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये शेळ्या जगत असल्याने यात नुकसान होणे फार कमी असते.
बटेर पालन - बटेर पक्षी पालन व्यवसाय ही आपल्याला अधिक उत्पन्न देणार आहे. मांस आणि अंडी साठी या पक्ष्यांना अधिक मागणी असते. हा व्यवसायाला पोल्ट्रीपेक्षा कमी खर्च लागत असतो. एका कोंबडीला पाळण्यात जितका खर्च येतो त्या खर्चाच आपण ६ बटेर पक्षी पाळू शकतो. विशेष म्हणजे मादा बटेर ४५ दिवसापासूनच अंडे देत असते.
मोतींची शेती - सध्या शेतकरी नव- नवीन प्रयोग करत असतात. त्यातून ते आपले यश मिळवत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मोती शेती सर्वोत्तम पर्याय आहे. या शेतीतून खूप पैसा मिळत असल्याने उत्तर भारतातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. मोतींची शेती आपण दहा बाय दहाच्या तलावात करू शकतो. या शेतीसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी अधिक चांगला आहे. एका शिंपले ८ ते १२ रुपयांना मिळते. त्यातून उत्पादित होणारे मोती हे १ मिमी ते २० मिमीच्या आकाराचे असतात. या मोतींची किंमत साधरण ३०० ते १५०० रुपये इतकी असते.
मेंढी पालन - हाही शेळी पालनासारखा व्यवसाय आहे. यातून आपण जबरदस्त नफा मिळवू शकतो. मेंढींची मागणी ही मांस, दुधासाठी असते, याशिवाय यापासून निघणारे लोकर याला प्रचंड मागणी असते.
Published on: 12 August 2020, 01:04 IST