गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सर्वत्र थकित वीज बिलाचा मुद्दा मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजधानीपर्यंत सर्व्या ठिकाणी याची जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ देखील बघायला मिळत आहे. थकित वीज बिलापोटी महावितरणने कडक कारवाई करत वीज जोडणी अभियान हातात घेतले होते
मात्र याला विरोधी पक्षाने तसेच राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केल्यामुळे तूर्तास महावितरणने या निर्णयावर स्थगिती लावली असून ज्या शेतकऱ्यांची वीजतोडणी झाली आहे त्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा वीजजोडणी केली जाणार आहे.
यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी या मुद्द्यावर राजकारण काही शांत होण्याचे नाव घेत नाही. थकित वीजबिल संदर्भात आपले मत व्यक्त करताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, आधीच्या भाजप सरकारच्या काळात वीज बिलासाठी चुकीच्या पद्धतीने यंत्रनेचा वापर केल्याने तसेच ग्राहकांकडून वेळीच वीज बिल वसुली न केल्याने वीजबिलाचा फुगवटा वाढला आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, भाजपच्या काळात वीज बिल वसुली केली गेली नाही त्यावेळी फक्त ऑफिसमध्ये बसूनच वीज बिलाची वसुली केली केली होती. भाजपच्या काळात शेतकऱ्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कुणाकडूनच सक्तीची वीजबिल वसुली केली गेली नाही.
त्या काळात ग्राहकांना वीज बिल का पाठवले गेले नाही वीज बिलाची आकारणी का केली गेली नाही हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. भाजपच्या काळातील या चुकीच्या कामामुळे वीज बिलाचा फुगवटा वाढतच गेला.
त्या काळात वीज बिल वसुली न झाल्यामुळे पाच वर्षाचे विज बिल एकदाच शेतकऱ्यांना भरावे लागत आहे आणि त्यामुळे वीजबिलाचा फुगवटा झाल्याचे मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले. मंत्रिमहोदयांनी, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे देखील नमूद केले आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य शासनाने तूर्तास म्हणजेच तीन महिने सक्तीची वीज बिल वसुली मोहीम थांबविली आहे आणि ज्यांचे कनेक्शन तोडले गेले होते त्यांना पुन्हा एकदा वीजपुरवठा दिला जाणार आहे. मात्र असे असले तरी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सर्व ग्राहकांना या कालावधीत वीज बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या:-
काहीही हं महावितरणा! शेतपंपाचे 33 लाखांचे काढले वीजबिल; शेतकऱ्याची झोपचं उडाली
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
खरं काय! 'या' कारणामुळे कांद्याच्या मागणीत झाली मोठी घट आणि म्हणुन…..!
Published on: 19 March 2022, 05:45 IST