News

नवी दिल्ली - या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरी बसून आपली कामे करता येणार आहेत. या फार्ममित्र ॲपमध्ये शेतकऱ्यांना फक्त विमाच नाहीतर शेतीसाठी काय उपयोगी आहे. शेतीतील सुधारणेसाठी काय करावे, अशा प्रकारच्या सुचनाही मिळणार आहेत.

Updated on 06 March, 2020 10:52 AM IST


ग्राहकांना आर्कषित करण्यासाठी आणि सोयी पुरविण्यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपले ॲप लॉन्च केले आहेत. ग्राहकांना याचा चांगलाच फायदा होत असतो. ज्या कामांना आपल्याला ताटकळत राहावे लागते. ती कामे ॲपच्या मदतीने अगदी काही मिनिटात पूर्ण होतात. हीच नस पकडत विम्या कंपन्यांमध्ये अग्रण्य असलेली बजाज कंपनीने शेतकऱ्यांसाठी फार्ममित्र हे ॲप आणले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरी बसून आपली कामे करता येणार आहेत. या फार्ममित्र ॲपमध्ये शेतकऱ्यांना फक्त विमाच नाहीतर शेतीसाठी काय उपयोगी आहे. शेतीतील सुधारणेसाठी काय करावे, अशा प्रकारच्या सुचनाही मिळणार आहेत. या फार्ममित्र ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. विविध माहितींनी परिपूर्ण असलेले हे ॲप बळीराजाला सशक्त बनवेल. बळीराजासाठी बहुपयोगी असलेल्या या ॲपची वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत.

योग्यवेळी हवामानाची माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. जर बदलत्या हवामानाची अगाऊ माहिती मिळाली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. बऱ्याचवेळा बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. पण बजाज कंपनी (Bajaj Allianz General Insurance) च्या फार्ममित्र या ॲपमुळे शेतकरी आता चिंतामुक्त होणार आहेत. आपल्या परिसरातील हवामानाविषयीची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळणार आहे. या फार्ममित्र ॲपमध्ये असलेल्या क्रॉपडॉकच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांवरील समस्यांचे निदान होणार आहे.

चांगली बाजारपेठ निवडता यावी यासाठी हे फार्ममित्र ॲप मदत करेल. याशिवाय शेतमालाला काय बाजारभाव मिळतो आहे. बाजारस्थिती आणि कृषि क्षेत्रातील चालू घडामोडींची माहितीही यातून मिळणार आहे. आपल्या परिसरात माती परीक्षण प्रयोगशाळा कुठे आहेत. खते व खाद्य विक्रेते आणि परिसरातील शीतगृह कुठे आहेत. याची माहितीही आपल्याला या फार्ममित्र ॲपमधून मिळणार आहे. यासह पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) चा विमाही आपण येथून घेऊ शकता. या ॲपद्वारे तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती, नोंद करू शकतात. मोटर आणि आरोग्याचा विमाही कंपनीने दिला आहे. विशेष म्हणजे हाताळण्यासाठी हे फार्ममित्र ॲप अगदी सोपे आहे. कारण हे प्रादेशिक भाषेत आहे. जो शेतकरी मराठी वाचतो त्याला हे ॲप अगदी सहजपणे वापरता येईल.

कसे डाऊनलोड कराल फार्ममित्र ॲप

कोड स्कॅन करा किंवा गुगल प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल करा.

नोंदणी करा.

नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक भरा आणि सादर करा.

काय आहेत वैशिष्ट्ये

  1. निवडक पिकांसाठी कृषि सल्ला देणारे व्यासपीठ.
  2. आपली मराठी भाषा.
  3. हवामानाची माहिती.
  4. बाजारभाव.
  5. माहिती केंद्र.
  6. पिकांवरील समस्यांचे निदान.
  7. पीक विमा पॉलिसीची ई- कॉपी मिळते.
  8. आपल्या गरजेनुसार निवडा विमा.


English Summary: bajaj Allianz General Insurance launches ‘Farmitra’ app
Published on: 05 March 2020, 06:15 IST