कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत साडेआठशे रुपायाची कापसाची बॅग साडेबाराशेपासून तर 2300 रुपयांपर्यंत विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आहे.
बोगस आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांना सोडणार नाही अशी भूमिका कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी स्पष्ट केली आहे. असे असताना त्यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार सुरु आहे.
एका कृषी दुकानात जाऊन कापसाच्या बियाणाची विचारपूस केली. ज्यात कब्बडी नावाच्या वानाबाबत विचारले असता, त्याची किंमत साडेबाराशे रुपये सांगण्यात आली. मला बाराशे रुपयांना मिळत असून, त्यात मला 50 रुपये उरतात, असेही दुकानदार म्हणाला. सरकराने सर्वच कापसाच्या बॅगेची किंमत 853 रुपये निश्चित केली आहे.
शेतकऱ्यांनो अशा प्रकारे करा सीताफळ बहराची तयारी
मंत्री संदिपान भुमरे यांचे गाव पाचोडला ग्रामपंचायत गाळ्यात असलेल्या एका कृषी दुकानात संकेत नावाच्या कापसाच्या बॅगेची मागणी केली. यावेळी त्याची किंमत तब्बल 2300 रुपये सांगण्यात आली. आज पैसे देऊन बुक केल्यावर उद्या बियाणे मिळतील, असेही सांगण्यात आले. या बियाणेचे पक्के बिल देखील मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.
गायींच्या या तीन जाती संभाळल्यास करोडपती व्हाल,रोज देऊ शकतात 50 लिटरहून अधिक दूध
यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच कृषीमंत्री यांच्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय चित्र असेल असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लंपी रोगामुळे पांगरा येथे अनेक जनावरे दगावली,शासकीय पशुसंवर्धन खात्याच्या डाॅक्टरांचे दूर्लक्ष
आता शुगर फ्री तांदूळ विकसित होणार, शास्त्रज्ञांचे काम सुरू
बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Published on: 13 June 2023, 12:49 IST