News

सध्या हरभरा बाजारपेठेत येत असून प्रशासनाच्या हमीभाव केंद्रांवर देखील हरभरा खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु या हमीभाव केंद्रांचे खरेदीची प्रक्रिया पाहता शेतकरी खूपच त्रस्त झाले आहेत.

Updated on 27 March, 2022 9:04 AM IST

 सध्या हरभरा बाजारपेठेत येत असून प्रशासनाच्या हमीभाव केंद्रांवर देखील हरभरा खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु या हमीभाव केंद्रांचे खरेदीची प्रक्रिया पाहता शेतकरी खूपच त्रस्त झाले आहेत.

खरेदीची प्रक्रिया अतिशय कासव गतीने सुरू असून दोन दोन हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली असताना केवळ 30 शेतकऱ्यांना खरेदीसाठी बोलावून थट्टा केली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार रणधीर सावरकर व कार्यकर्त्यांनी शनिवारी खरेदी केंद्रावर केला. या पार्श्‍वभूमीवर 26 नक्की वाचा:दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मल्टिटास्किंग व हवालदार पदासाठी भरती

मार्च रोजी अकोला येथील खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याबाबतची माहिती अशी की, जर हरभरा हमीभावाचा विचार केला तर तो प्रतिक्विंटल पाच हजार दोनशे तीस रुपये आहे. खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना चार हजार सहाशे ते चार हजार  सातशेच्या आसपास भाव मिळत आहे.

जर दररोज हरभऱ्याची आवक पाहिली तर ती 9000 क्विंटलच्या आसपास आहे. अशा प्रसंगी एफसीआई मार्फत केवळ दहा टक्केच हरभरा खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामागे जबाबदार कोण असा सवाल भाजपने केला असून मोजणीचे काम 50 टक्के पेक्षा जास्त गतीने करावे, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप वातावरण तयार झाल्यास त्याला अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा भाजप लोकप्रतिनिधींनी खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांना दिला. याबाबतीत  आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून या बाबतची माहिती दिली. 

या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची लूट दररोज होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हा सगळा प्रकार अकोला जिल्ह्यातील सगळ्यात केंद्रांवर सुरू असून अन्य केंद्रांवर ही परिस्थिती अतिशय भयानक असल्याचे भाजप नेते म्हणाले.

English Summary: bad situation to msp center of gram crop so farmer so anxiety and worried
Published on: 27 March 2022, 09:04 IST